Arpora Birch Nightclub  Dainik Gomantak
गोवा

Birch Night Club: ‘बर्च’ने गुन्‍ह्यांतून मिळवले 22 कोटी! ED चा निष्‍कर्ष; तपासामुळे काही राजकारण्‍यांचेही धाबे दणाणले

Goa Nightclub Fire: प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्‍य सरकारने हडफडे–नागवा पंचायतीचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि तत्‍कालीन सचिव रघुवीर बागकर यांचे निलंबन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गेल्‍या ६ डिसेंबर रोजी आग लागलेला हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्‍लब आवश्‍‍यक परवान्‍यांशिवाय सुरू होता. त्‍यामुळे २०२३–२४ आणि २०२४–२५ मध्‍ये मिळवलेले २२ कोटी गुन्‍ह्यांतून मिळवलेले होते, असा निष्‍कर्ष ‘ईडी’ने तपासाअंती काढलेला आहे.

‘बर्च’ मधील अग्नितांडवात तेथील कामगार आणि पर्यटक मिळून २५ जणांचा मृत्‍यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्‍य सरकारने हडफडे–नागवा पंचायतीचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि तत्‍कालीन सचिव रघुवीर बागकर यांचे निलंबन केले. त्‍यानंतर या दोघांसह क्‍लबचे मालक असलेल्‍या लुथरा बंधूंनाही अटक करण्‍यात आली.

त्‍यानंतर ‘ईडी’ ने कारवाई सुरू करीत मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गेल्‍या शुक्रवारी गोवा, दिल्ली आणि गुडगावमधील नऊ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या छाप्‍यांदरम्‍यान ‘ईडी’च्‍या अधिकाऱ्यांनी सौरभ आणि गौरव लुथरा बंधू, माजी सरपंच रोशन रेडकर तसेच पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्या निवासस्थानांची झाडाझडती घेतली.

दरम्यान, याप्रकरणी तपासादरम्‍यान ‘ईडी’ला मिळालेल्‍या कागदपत्रांनुसार, बर्च बाय रोमियो लेन या क्लबमधून बेकायदेशीररीत्‍या मिळवलेले कोट्यवधी रुपये वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळवण्‍यात आल्‍याचे दिसून आल्‍यानंतर ती सर्व खाती तातडीने गोठवण्यात आली आहेत.

राजकारण्यांचेही धाबे दणाणले!

रोमियो लेन प्रकरणात माजी सरपंच रोशन रेडकर तसेच तत्‍कालीन सचिव रघुवीर बागकर यांना अटक करण्‍यात आलेली आहे. त्‍यामुळे या दोघांनी कोणाच्‍या आशीर्वादाने रोमियो लेन चालवण्‍यास लुथरा बंधूंना पाठबळ दिले, याचाही शोध ‘ईडी’चे अधिकारी घेत आहेत. त्‍यामुळे काही राजकारण्‍यांचेही धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT