Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'लुथरा बंधूंना फाशी द्या', बर्च अग्निकांडप्रश्‍नी दिल्लीत निदर्शने; पीडितांच्या नातेवाईकांची जंतरमंतर येथे न्यायाची मागणी

Arpora Nightclub Fire: हडफडेतील ‘बर्च बाय रोमियो लेन’ क्लबमधील अग्निकांडातील पीडितांसाठी त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे न्यायाची मागणी करत निदर्शने केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडेतील ‘बर्च बाय रोमियो लेन’ क्लबमधील अग्निकांडातील पीडितांसाठी त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे न्यायाची मागणी करत निदर्शने केली. या प्रकरणातील संशयित सौरभ आणि गौरव लुथरा या बंधूंना फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

६ डिसेंबर रोजी घडलेल्या या दुर्घटनेत २५ जणांचा जीव गेला होता. त्यात भावना जोशी यांच्या पतीसह तीन बहिणींचा मृत्यू झाला होता. भावना जोशी या पती आणि बहिणींसह गोव्यात सुटीचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या; परंतु या नाईट क्लबला लागलेल्या आगीत चौघांचा जीव गेला.

जोशी कुटुंबीयांनी घेतला पुढाकार

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या २५ लोकांना न्याय मिळावा, यासाठी रविवारी सकाळी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे निदर्शने केली. यात पीडितांची मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी सहभाग घेतला होता. या दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबातील पाचव्या सदस्य भावना जोशी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत आणि सर्व पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत.

आम्हाला न्याय द्या!

‘दोन्ही बंधू खुनी आहेत’, ‘त्या खुनी बंधूंना फाशी द्या’ अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. २५ जणांचा बळी घेणाऱ्या या दोघांना आंदोलनकर्त्यांनी जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर या घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे पीडितांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT