Luthra Brothers: लुथरा बंधूंची पोलिस कोठडी संपुष्टात! कोर्टात करणार हजर; चौकशी समितीच्या अहवाल होणार सादर

Goa Nightclub Fire: गेल्या पाच दिवसांपासून संशयित लुथरा बंधू पोलिस कोठडीत आहेत. मात्र, ते पोलिसांना तपासात असहकार्य करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.
Luthra Brothers
Luthra Brothers Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला ६ रोजी रात्री लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयितांपैकी सौरभ आणि गौरव लुथरा बंधूंची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात येणार असल्याने, सोमवारी (२२ डिसेंबर) हणजूण पोलिस या दोघांना पुन्हा म्हापसा जेएमएफसी कोर्टात हजर करणार आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून संशयित लुथरा बंधू पोलिस कोठडीत आहेत. मात्र, ते पोलिसांना तपासात असहकार्य करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे हणजूण पोलिस उद्या न्यायालयासमोर लुथरा बंधूंची आणखीन किती दिवसांची पोलिस कोठडी मागते आणि न्यायालयास काय नवीन माहिती पुरवते, हे पाहावे लागेल. खुल्या कोर्टात ही सुनावणी होईल.

Luthra Brothers
Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

बर्च नाईट क्लबमध्ये आग नेमके कशामुळे लागली, याचा तपास करण्यासाठी गोवा सरकारने दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीला सरकारने तपासाचा अहवाल देण्यासाठी आणखीन वेळ वाढवून दिला होता. त्यामुळे चौकशी समिती काय अहवाल मांडते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Luthra Brothers
Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

अजयला जेल कि बेल?

लुथरा बंधूंचा सहभागीदार संशयित अजय गुप्ता याचीही पोलिस कोठडी संपुष्टात येणार असून, त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसेच अजयने दाखल केलेल्या जामीन अर्जासंदर्भात हणजूण पोलिस सोमवारीच म्हणणे सादर करणार आहेत. त्यामुळे अजयला जामीन मिळतो की, पुन्हा कोठडीत वाढ होते, हे न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. इतर चार संशयितांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी (२२ डिसेंबर) न्यायालय निकाल देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com