Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Arpora Sarpanch : 'हा 25 निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गंभीर गुन्हा', हडफडे सरपंचांच्या जामीन अर्जावर निकाल राखीव

Arpora Nightclub Fire: रोशन रेडकर यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून युक्तिवाद केला की, संबंधित इमारतीचे बांधकाम २००५ पासून अस्तित्वात आहे. रेडकर २०२२ मध्ये सरपंच झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमधील भीषण अग्निकांड प्रकरणातील संशयित हडफडे पंचायतीचे माजी सरपंच रोशन रेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सोमवारी अंतिम सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडताना अटकेची तीव्र गरज व्यक्त केली. हे केवळ तांत्रिक त्रुटीचे प्रकरण नसून २५ निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गंभीर गुन्हा आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. केवळ राजकीय नेता किंवा सामाजिक प्रतिमा या कारणास्तव संशयितांना सूट देणे अन्यायाचे ठरेल.

२०१६ मध्ये ''बार आणि रेस्टॉरंट''साठी असलेल्या परवानगीचे ''नाईट क्लब''मध्ये बेकायदेशीर रूपांतर कसे झाले? आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यात सरपंचाचा किती सहभाग होता? हे शोधण्यासाठी कोठडीतील चौकशी अनिवार्य असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले.

रोशन रेडकर यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून युक्तिवाद केला की, संबंधित इमारतीचे बांधकाम २००५ पासून अस्तित्वात आहे. रेडकर २०२२ मध्ये सरपंच झाले, तर अनेक परवानग्या २०१६ मध्येच देण्यात आल्या होत्या. सरपंच म्हणून त्यांनी केवळ पंचायतीच्या सामूहिक ठरावावर स्वाक्षरी केली आहे.

एखादा निर्णय हा संपूर्ण पंचायतीचा असतो, त्यासाठी केवळ एका व्यक्तीला जबाबदार धरणे चुकीचे आहे. तसेच, पाडकामाचे आदेश देऊनही पंचायत संचालकांनी त्याला स्थगिती दिली होती, याकडेही लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT