Arpora Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; फरार सचिव रघुवीर बागकर अखेर गजाआड! हणजूण पोलिसांची कोलवाळेत कारवाई

Arpora Nightclub Fire Update: सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना हणजूण पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

हडफडे येथील 'बर्च अग्निकांड' प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना हणजूण पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बागकर फरार झाला होता, मात्र पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं आहे.

रघुवीर बागकरने अटकेपासून वाचण्यासाठी म्हापसा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासातील अडथळे लक्षात घेऊन न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

न्यायालयाचा निकाल विरोधात लागताच बागकर अज्ञातस्थळी फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले होते, अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले.

Arpora Nightclub Fire
Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

'बर्च अग्निकांड' प्रकरणात नाव आल्यानंतर आणि कामातील अनियमितेचा ठपका ठेवल्यानंतर सरकारने बागकरला यापूर्वीच पंचायत सचिव पदावरून बडतर्फ केले होते.

या आगीच्या घटनेमागे नेमके काय गौडबंगाल आहे आणि त्यामध्ये पंचायत स्तरावर कोणत्या परवानग्या किंवा कागदपत्रांची फेरफार झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

Arpora Nightclub Fire
Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

बागकर याच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील अनेक गुप्त माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हणजूण पोलीस स्टेशनचे अधिकारी आता बागकर याची सखोल चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com