'Portuguese Hukumnama' book published Dainik Gomantak
गोवा

Goa Revolution Day : पणजीतील संस्कृती भवनात 'पुराभिलेख सप्ताह प्रदर्शना'ला सुरुवात

प्रदर्शनात राष्ट्रीय पत्रे, पुस्तके, कविता, पोस्टर, बॅनर, माहितीपत्रकांचा समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

पोर्तुगीज राजवटीत गोव्याच्या मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याबद्दल स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ पुराभिलेख विभाग दरवर्षी 18 जूनपासून पुराभिलेख सप्ताह प्रदर्शन आयोजित करते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या 'अनसंग हिरोज ऑफ गोवा' या प्रदर्शनाचे उदघाटन पुराभिलेख संचालक दीपक बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मोडी मराठीचे जाणकार रत्नाकर देसाई यांनी संपादित केलेल्या ‘पोर्तुगीज हुकूमनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगीजविरोधी प्रचारासाठी शिक्षा झाली, तेव्हा त्यांच्याकडे राष्ट्रीय पत्रे, पुस्तके यासारखे जे काही सापडले, त्यांच्याकडून ती पत्रे, बॅनर जप्त केले आणि ते त्यांना शिक्षा करण्यासाठी पुरावे म्हणून वापरले.

हा अनमोल ठेवा आज गोमंतकीयांसमोर खुला करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये गोवा मुक्ती चळवळीशी संबंधित विविध ऐतिहासिक नोंदी प्रदर्शित करण्यात आल्या. यामध्ये गोवा मुक्ती चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती व कामगीरी प्रदर्शित करण्यात आली आहे.

‘पोर्तुगीज हुकूमनामा’ या पुस्तकात पोर्तुगीज सरकारच्या विशेषत: फोंडा महालाशी संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजाविषयी उल्लेख आहे. हे प्रदर्शन गोमंतकीयांना पणजीत पाटो येथील संस्कृती भवनात 10 ते 5 या वेळेत पाहता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT