Arambol tree cutting issue  Dainik Gomantak
गोवा

Arambol: जंगल भागात झाडांची कत्तल! हरमल ग्रामस्थ संतप्त; तक्रारीनंतर पंचायत मंडळाने केली पाहणी

Arambol tree cutting issue: ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पंचायत तसेच वनखाते या परिसराची संयुक्त पाहणी केली. गणेश चतुर्थीच्या काळात हे काम करण्यात आले असून ते पूर्णतः बेकायदेशीर आहे.

Sameer Panditrao

हरमल: पंचायत प्रभाग नऊमधील भटवाडी परिसरातील जंगल भागात झाडांची कत्तल करून सुमारे तीन लाख वीस हजार चौरस मीटर जागेत सिमेंट पोल उभारून कुंपण उभारले असल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पंचायत तसेच वनखाते या परिसराची संयुक्त पाहणी केली. गणेश चतुर्थीच्या काळात हे काम करण्यात आले असून ते पूर्णतः बेकायदेशीर आहे.

हा जंगल भाग संवेदनशील व जैवविविधतेने नटलेला असून जलचर प्राणी, वाघ आदी जंगली श्वापदांचा येथे सदैव वावर असतो. येथे साधारणपणे तीन मीटर रुंद पट्ट्यातील झाडांची कत्तल करून कुंपण उभारले आहे.

ग्रामस्थांनी ३० सेंटीमीटरपेक्षा जास्त घेर असलेल्या झाडांची कत्तल झाल्याचे नोंद केले आहे. मात्र वनविभाग ही झाडी (बुश) असल्याचे सांगत आहे. मात्र, आम्ही खास नोंद केली आहे,असे आत्मजी नाईक यांनी सांगितले. या डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती तसेच विहिरी, शेतजमीन असून या जंगल भागातून येणाऱ्या पाण्यावर शेती लागवड, नारळ, सुपारीचे पीक घेतले जाते, असे नाईक यांनी सांगितले.

येथील सीताराम नाईक यांनी सर्वे क्र. २७२/०, २४२/०, २४२/१ या जागेत बेकायदा झाडांची कत्तल करून कुंपण बांधले असल्याची तक्रार पंचायत व वनविभागाला दिली होती. त्यानुसार पंचायतीने संयुक्त पाहणी केली. यावेळी सरपंच सुशांत गावडे, उपसरपंच सोनाली माज्जी, पंच अनुपमा मयेकर, रजनी इब्रामपुरकर, संतान फर्नांडिस, फिल्पा फर्नांडिस तसेच माजी पंच प्रविण वायंगणकर, वेलेरीन फर्नांडिस, मनोहर केरकर व नागरिक उपस्थित होते.

हरमल भागात झाडांचा संहार होऊ देणार नाही. संबंधितांवर गुन्हे नोंद झाले पाहिजेत. यापुढे असे प्रकार येथे खपवून घेणार नसल्याचे काँग्रेसचे नारायण रेडकर यांनी यावेळी सांगितले.

... संबंधितांना नोटिसा पाठवणार : सरपंच

या पाहणीत येथे झाडे कापून कुंपण उभारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. एक चौदा उताऱ्यात असलेल्या व्यक्तींना नोटिसा पाठवल्या जातील, असे सरपंच गावडे यांनी यावेळी सांगितले. पंचायत सचिव नार्वेकर यांनीही कायद्यानुसार कारवाई होईल, असे सांगितले.

... वनविभाग दबावाखाली : नाईक

दरम्यान, वनखात्याचे अधिकारी दबावाखाली असल्याचा आरोप तक्रारदार सीताराम नाईक यांनी केला. तसेच पंचायत योग्य ती कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

... वृक्षतोड, दबाव नाही : वनविभाग

दरम्यान वनविभागाचे जितेंद्र नाईक यांनी वनविभागाने या परिसराची पाहणी केली असून झाडे तोडल्याचे आढळले नाही. तसेच वनविभागावर कोणाचाही दबाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT