Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Bamanbhati Water Crisis: वास्तवात पाण्याचा निचरा एक ओहोळातून होत होता, मात्र कोणा एका धनाढ्य व्यक्तीने त्या ओहोळात काँक्रिट घालून रस्ता तयार केल्याने पाण्याचा निचरा होत नाही.
Bamanbhati Water Crisis in Agriculture Land
Bamanbhati Water Crisis in Agriculture LandDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: बामणभाटी येथील शेतजमिनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेली चार वर्षे पडीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त करीत आहेत.

सुमारे १० हजार चौरस मिटर या जागेत किमान १ ५ते २० शेतकरी भातशेती, मिरची व अन्य उत्पादने घेत होते. परंतु येथील रस्त्याची उंची वाढविल्याने व या शेतातील पाणी निचरा होण्यास वाट नसल्याने पाणी तुंबून राहते. त्यामुळे गेली चार वर्षे ही शेती पडीक आहे.

Bamanbhati Water Crisis in Agriculture Land
Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

वास्तवात पाण्याचा निचरा एक ओहोळातून होत होता, मात्र कोणा एका धनाढ्य व्यक्तीने त्या ओहोळात काँक्रिट घालून रस्ता तयार केल्याने पाण्याचा निचरा होत नाही. डोंगरावरून येणारे पाणी शेत जमिनीत साचून राहते. त्यामुळे येथे शेती करता येत नाही, असे शेतकरी ठाकूर यांनी सांगितले.

Bamanbhati Water Crisis in Agriculture Land
Talpan River Flood: पाईप वाहून गेले, सुपाऱ्या - ऊसाचे नुकसान; तळपण नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका

अधिकाऱ्यांकडून पाहणी, पण...

कृषी, बांधकाम व जलस्रोत खात्याचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली, मात्र आतापर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. उपाययोजना झाल्यास १० हजार चौरस मीटर जमीन लागवडीखाली येईल,असे शेतकरी दत्ताराम ठाकूर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com