
हरमल: चोपडे-हरमल मार्गावरील खड्डे जेट पॅचरने बुजविण्याचे काम हाती घेतले खरे, मात्र कित्येक खड्डे ठेवले आहेत, त्यामुळे वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी हरमल पंचायत क्षेत्रात मोडणाऱ्याया रस्त्यावरील खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात येत होते, मात्र येथील कित्येक खड्डे तसेच ठेवल्याचे दिसून येत आहेत.
प्रभाग चारमध्ये केपकरवाडा आगरानजीक असलेल्या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांची समस्या मिटली असली तरी तिठा भागात, बँक ऑफ इंडिया, पेट्रोल पंप, सार्वजनिक सभागृहानजीकच्या रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची भंबेरी उडत असून छोटे मोठे अपघात घडत आहेत, असे वाहनचालक प्रमोद पेडणेकर यांनी सांगितले.
प्रमुख रस्त्यांच्या देखभालीसाठी पंचायतीला निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. जेणेकरून खड्ड्यांची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते, असे मत दयानंद सावंत यांनी व्यक्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, खड्ड्यांत पावसाचे पाणी तुंबून होते, परंतु हे पाणी उपसून तिथे डांबर घालणे आवश्यक होते. परंतु कंत्राटदाराने हलगर्जीपणा करत केवळ पाणी नसलेल्या खड्ड्यात जेट पॅचरने डांबर घालण्यात आले. त्यामुळे कित्येक खड्डे तसेच राहिले आहेत. मधलामाज येथील रस्त्यावर एक धोकादायक खड्डा असून हा खड्डा अपघाताला कारण ठरत आहे. आमदार जीत आरोलकर यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.