Arambol Bhatwadi tree cutting Dainik Gomantak
गोवा

Arambol: वृक्षतोड नाही, झाडी कापली! वन खात्याचा हास्यास्पद दावा; हरमलमध्ये संतापाची लाट

Arambol Bhatwadi tree cutting: अनेक झाडांची नोंद न करता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी स्वतंत्र नोंद केली. प्रत्यक्षात झाडाचा बुंधा ५० सेंटीमीटर घेराचा होता.

Sameer Panditrao

हरमल: भटवाडी येथील सर्व्हे नंबर २७५/०, २४२/०, २४२/१ अ मधील अंदाजे तीन लाख वीस हजार चौरस मीटर जागेतील वृक्षतोड नसून झाडी कापण्याचा प्रकार असल्याची सारवासारव वन खात्याचे अधिकारी जितेंद्र नाईक यांनी केली.

हा प्रकार हास्यास्पद असून, वन खात्याने त्वरित अन्य अधिकाऱ्यांकरवी पाहणी करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. परवा या डोंगर भागात बेकायदेशीर कुंपण तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करून बेफाम वृक्षतोड केल्याची तक्रार पंचायत व वन खात्याकडे केली होती.

दरम्यान, पंचायत व वन खाते यांनी संयुक्त पाहणी केली त्यावेळी सरपंच सुशांत गावडे व वन खात्याचे जितेंद्र नाईक तसेच उपसरपंच सोनाली माज्जी, पंच अनुपमा मयेकर, प्रभाग ९च्या रजनी इब्रामपूरकर, संतान फर्नांडिस, प्रजॉय फर्नांडिस, माजी सरपंच मनोहर केरकर, माजी पंच प्रवीण वायंगणकर, पंचायत सचिव रजत नार्वेकर, तक्रारदार सीताराम नाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साधारण तीन किलोमीटर लांबीचे कुंपण उभारताना केवळ झाडी कापण्यात आल्याचे सांगणे म्हणजे ‘आंधळे दळते...’ असा प्रकार झाला आहे. त्या जागेत केवळ झाडी होती व ती कापून कुंपण उभारणे शक्य नाही. या जागेत वृक्षतोड झाली नाही म्हणणे धाडसाचे असल्याचे नाईक यांनी सांगितले.

फक्त लहान बुंध्यांचे मोजमाप!

या वाड्यावरील युवक व ग्रामस्थांनी प्रत्येक झाडाची नोंद केली होती. मात्र, वन खात्याच्या नियमांना पद्धतशीर बगल देत झाडांची कापणी करण्यात आली. अनेक झाडांची नोंद न करता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी स्वतंत्र नोंद केली. प्रत्यक्षात झाडाचा बुंधा ५० सेंटीमीटर घेराचा होता; परंतु अधिकाऱ्यांनी केवळ लहान झाडांच्या बुंध्यांचे मोजमाप केल्याचा आरोप तक्रारदार नाईक यांनी केला.

परवाने रद्द करावेत!

हा भटवाडी भागातील रहिवाशांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. वृक्षतोडीमुळे पूर्वजांनी राखून ठेवलेल्या या डोंगरावर वनौषधी, झरे व जंगली श्वापदांना मुक्त संचार करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय जलस्रोत पूर्णपणे लुप्त होतील, पाणीटंचाई होईल, नारळ, सुपारीची बागायती ओस पडेल, त्याचा फटका लोकवस्तीला बसेल. त्यामुळे सरकारने जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून त्वरित परवाने रद्द करावेत, अशी मागणी शिक्षक व रहिवासी आत्माजी नाईक यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT