Subhash Shirodkar
Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: जलसंवर्धन गोव्यासाठी खूप महत्त्वाचे

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात पाण्याची कमतरता सध्या जरी भासत नसली तरी पाण्याचा सांभाळ करणे महत्त्वाचे आहे. पुढील 20 वर्षांसाठी संपूर्ण गोव्यासाठी पाणी पुरेल यासाठी आतापासूनच सजग राहण्याचे आवाहन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

चिंचोणे येथील सेंट सेबस्तियन चर्चजवळील पाटो येथील 30 हेक्टर शेतजमीन लागवडीखाली आणण्याच्या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार क्रुझ सिल्वा, सरपंच वालेंतीन बार्रेटो व इतर मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.

जलस्रोत खात्यातर्फे गोव्यातील तळी, झरे, कालवे स्वच्छ करणे त्यासाठी साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. साळावली येथील धरणाची उंची वाढविण्यात येईल तर धारबांदोडे-काजूमळ येथील धरणाच्या बांधकामाचा पाया डिसेंबर 2023 मध्ये रचला जाणार असल्याची घोषणा जलस्रोतमंत्र्यांनी येथे केली.

युवकांनी शेतीला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. चिंचोणे येथील युवकांनी शेती लागवडीसाठी जो पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. गोव्यात जास्तीत जास्त जमीन शेती लागवडीखाली आली पाहिजे. जलस्रोत संचालनालय यासाठी सर्वतोपरी मदत करेल.

- सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT