Goa Fish Festival 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Festival: 'ॲक्वा फिश फेस्टिव्हल’ला गर्दी! सत्रे, स्पर्धांनादेखील प्रचंड प्रतिसाद

Aqua Goa Mega Fish Festival: गोव्यातील मत्स्यसंस्कृती आणि सागरी परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल’ला लोकांची मोठी गर्दी जमली

Sameer Panditrao

Aqua Goa Mega Fish Festival 2025

पणजी: गोव्यातील मत्स्यसंस्कृती आणि सागरी परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल’ला लोकांची मोठी गर्दी जमली, तर विविध सत्रे आणि स्पर्धांनादेखील प्रचंड प्रतिसाद लाभला.

गोवा सरकारच्या मत्स्य विभागाच्यावतीने कांपाल-पणजी येथे आयोजित ‘फिश फेस्टिव्हल’च्या आठव्या आवृत्तीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. येथे समृद्ध मत्स्यसंस्कृतीचे यशस्वीरीत्या प्रदर्शन करण्यात आले असून विविध प्रकारचे मासे दाखविण्यात आले आहेत.

कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणून आयोजित केलेल्या पॅनेल चर्चेत ‘मासे हाताळण्याचे सर्वोत्तम व्यवस्थापन तंत्र’ आणि ‘समुद्री खाद्य उत्पादने मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण’ याविषयांवर विशेष चर्चा करण्यात आली. मत्स्य व्यवसायाशी संबंधित लोकांना याचा विशेष लाभ घेता आला.

शनिवारी मुलांसाठी आणि सामान्य जनतेसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे स्पर्धकांनी आपल्या सर्जनशीलतेने, कल्पकतेने प्रेक्षकांची मने जिंकली.

विशेष आकर्षण

आजच्या कार्यक्रमात ‘पर्पल रेन’ या बँडच्या संगीत सादरीकरणासह गोव्यातील लोककला, बॉलिवूड नृत्य सादरीकरणे, अग्नी नृत्य सादरीकरण तसेच लाईव्ह संगीताचे विशेष कार्यक्रम सादर करण्यात आले. ‘एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२५’ हा केवळ एक महोत्सव नव्हे, तर गोव्याच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचे प्रतीक ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT