Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2023 : सहकार क्षेत्रातील दुरुस्ती विधेयक 2023ला मंजुरी

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विधेयक सादर केले

दैनिक गोमन्तक डिजिटल

सहकारी संस्थांतील आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी संबंधित संचालक किंवा सदस्यावर आजीवन बंदी घालण्याची तरतूद करण्यात आलेले सहकार क्षेत्रातील दुरुस्ती विधेयक 2023 शुक्रवारी सायंकाळी मंजूर करण्यात आले. सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी हे विधेयक सभागृहात सादर केले होते.

शिरोडकर म्हणाले, मागील पाच ते सहा वर्षांत राज्यातील मडगाव अर्बन, म्हापसा अर्बन किंवा व्हिजनरी सारख्या संस्था बुडाल्या. अशा सहकारी संस्थांना बुडविणारे पुन्हा दुसऱ्या संस्थेत सदस्य म्हणून जाऊ नयेत, यासाठी असे विधेयक महत्त्वाचे आहे. या विधेयकामुळे संचालकांवर दबाव राहू शकतो.

या विधेयकावर चर्चा करताना आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले, शेत जमिनीशी जोडलेल्या कोमुनिदाद संस्थेत घोटाळा करणाऱ्या सदस्यास नऊ वर्षे बंदी घातली जाते. परंतु सहकार क्षेत्रातील या बंदीला आपला विरोध आहे. आमदार वेंजी व्हिएगस यांनीही या विधेयकास विरोध केला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, आमदार अपात्र ठरल्यास दोन किंवा सहा वर्षे त्याला निवडणूक लढविता येत नाही. परंतु त्यानंतर तो निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे या विधेयकाचा विचार करणे आवश्यक आहे.

एखाद्यास आयुष्यभरासाठी अपात्र ठरविणे हा घोटाळ्यास बंदी आणण्यासाठी उपाय आहे का? एखाद्यावर कारवाई झाल्यास त्याला पुन्हा कोणतीच निवडणूक लढविता येणार नाही, त्याशिवाय विरोधी गटही आपल्या सोयीसाठी दुसऱ्यावर आरोप करून एखाद्यावर कारवाई करण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे सरकारने त्याचा विचार करणे आवश्यक आहे.

- विजय सरदेसाई, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

कारवर 3400 Kiss अन् VIDEO व्हायरल! गर्लफ्रेंडचा 'किसिंग स्टंट' पठ्ठ्याला पडला महागात; पोलिसांनी कार धुवायला लावून ठोठावला 5500 रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT