Goa Accident : प्रसंगावधानामुळे वाचला चिमुकलीसह दाम्पत्याचा जीव

दुचाकी चिरडली : ट्रक उलटण्यापूर्वी मारली मुलीसह उडी
Goa Accident
Goa AccidentGomantak Digital Team
Published on
Updated on

Goa Accident : ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार तिघेजण बचावले. चुकीच्या दिशेने ट्रक आल्याने हा अपघात घडला. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील आई, वडील आणि दोन वर्षांची मुलगी बचावली. अपघातात दुचाकी ट्रकच्या खाली आली. तर ट्रक रस्त्यावरच उलटला.

हा अपघात आज १२.४५ च्या सुमारास घडला. दुचाकीवरील तिघेजण बोंडलाला गेली होती, मात्र परतताना हा अपघात घडला. घटनेत दिनेश गावडे (३९), स्नेहल गावडे (३१) व दित्या गावडे (२) हे जखमी झाली. त्यांना लगेच तिस्क - उसगावातील पिळये येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त जीए ०५ टी ६५२७ या क्रमांकाचा ट्रक उसगावहून गांजेच्या दिशेने चालला होता. तर जीए ०५ एन ०५४९ या क्रमांकाची स्कूटर बोंडला येथून उसगावच्या दिशेने येत होती.

Goa Accident
Goa Crime: हरमलमधील चोरी प्रकरणाचा 2 दिवसांत छडा, कर्नाटकातील दोघांना अटक

अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी बचावकार्य करीत तिन्ही जखमींना आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. फोंडा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Goa Accident
Uric Acid levels: नको भीती युरिक ॲसिडची..

काळ आला होता,पण..!

बोंडला येथून परतताना उसगाव येथे भरधाव ट्रक अंगावर येत असल्याचे पाहून दुचाकीस्वार दिनेश गावडे याने प्रसंगावधान राखून दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचावासाठी अन्य कोणतेच साधन नसल्याने पाहून दिनेश आणि त्याची पत्नी स्नेहल या दोघांनीही क्षणार्धात चिमुकल्या दित्या सह रस्त्याच्या बाजूला उडी घेतली. त्यात चिमुकली दित्याही जखमी झाली. या घटनेमुळे काळ आला होता,पण वेळ आली नव्हती,या उक्तीचा प्रत्यय आल्याची प्रत्यक्षदर्शींमध्ये चर्चा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com