CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: सोलर रूफटॉफ वेब पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

काही दिवसांपुर्वीच व्यक्त केला होता पणजीला सोलर सिटी बनविण्याचा निर्धार
Published on

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोलर सोलर रूफटॉफ वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले. www.goasolar.in हे पोर्टल गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (गेडा) ने हे पोर्टल बनवले आहे. त्यासाठी 'गेडा'ला नवीकरणीय उर्जा आणि वीज खात्याने सहकार्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

CM Pramod Sawant
Yuri Alemao: सत्ताधारी आमदारांनीच सरकारला दाखवला आरसा; विरोधी पक्षनेत्यांनी केले कौतूक

मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अर्ज करण्यापासून ते अनुदान आणि सोलर बसविण्याबाबतची माहिती या पोर्टलमुळे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हे युजर फ्रेंडली पोर्टल आहे.

अहमदाबादच्या आहा सोलर कंपनीने या पोर्टलसाठी गेडाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. हे पोर्टल ज्या नागरिकांना रूफटॉप सोलर बसवून वीज निर्मिती करायची आहे त्यांच्यासाठी उपयोगी आणि लाभदायी ठरेल.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षात पणजी शहर स्मार्ट सिटीसह सोलर सिटी बनवणार असल्याचे म्हटले होते. पणजी शहराची वीजेची गरज आहे 80 मेगावॉट. सरकारी इमरतींसह लोकांनी घरावर सोलर पॅनेल बसवावेत. त्यातून पणजीला लागणारी सर्वच्या सर्व 80 मेगावॉट वीज सौरउर्जेद्वारे बनवणे शक्य आहे, असे ते म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com