CM Pramod Sawant, Budget Meeting X
गोवा

Goa Government Jobs: पुढील 2 वर्षांत 10 हजार सरकारी नोकऱ्या! मुख्‍यमंत्र्यांचा पुनरुच्‍चार; दहावी, बारावी अनुत्तीर्णांनाही मिळणार लाभ

CM Pramod Sawant: ताळगावातील मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारी झालेल्या भाजप कार्यर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

Sameer Panditrao

पणजी: ॲप्रेंटिशीप (प्रशिक्षणार्थी) योजनेंअतर्गत मागील वर्षात १४ हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. पुढील दोन वर्षांत सरकारातील विविध खात्यांमध्ये दहा ते बारा हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध केल्या जातील.

तसेच दहावी व बारावी अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी युवक व युवतींसाठी चार हजार पदे गोवा मानव संसाधन महामंडळातर्फे (गोवा ह्युमन रिसोर्स कार्पोरेशन) भरली जातील. या महामंडळातर्फे मिळणारी नोकरीसुद्धा सुरक्षित मानली जात असल्याचे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

ताळगावातील मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारी झालेल्या भाजप कार्यर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार जेनिफर मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थकुंकळ्येकर, सर्वानंद भगत, सरपंच मारिया फर्नांडिस, ताळगाव भाजप मंडळ अध्यक्ष व इतरांची उपस्थिती होती.

‘ॲप्रेंटिशीप’अंतर्गत १४ हजार जणांना लाभ

१.राज्य सररकारला चिंता आहे ती पदवी झालेल्यांची आणि दहावी-बारावी अनुउत्तीर्ण झालेल्यांची. त्यामुळे सरकार आगामी दोन वर्षांत लोकसेवा आयोगामार्फत दहा ते बारा हजार नोकऱ्या उपलब्ध करणार आहे.

२. आठवी, दहावी नापास झालेल्या युवकांना नोकरी मिळावी म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. प्रत्येक घरात कमी शिकलेल्यांना नोकरी मिळवून देण्याचे काम कार्यकर्त्यांचे आहे, त्यांनी अशा युवकांना मानव संसाधन महामंडळाकडे पाठविणे गरजेचे आहे.

३. आम्ही ध्येय आणि उद्दिष्ट ठेवून काम करीत आहे, सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी काम करायला हवे. युवा शक्तीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर ‘जॉब फेअर’ आयोजित केला, त्यातून केंद्र सरकारच्या खात्यांत नोकऱ्या दिल्या गेल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT