GPSC Recruitment Controversy Dainik Gomantak
गोवा

GPSC Recruitment: GPSC मधून नियुक्त झालेल्या सदस्यांना कोंकणीचे ज्ञान नाही; कृष्णा पंडित यांंनी उपस्थित केला सवाल

गोवा लोकसेवा आयोग (GPSC) मध्ये गोव्याबाहेरच्या सदस्यांच्या नियुक्तीमुळे वाद निर्माण झाला आहे

Kavya Powar

GPSC Recruitment Controversy: गोवा लोकसेवा आयोग (GPSC) मध्ये गोव्याबाहेरच्या सदस्यांच्या नियुक्तीमुळे वाद निर्माण झाला आहे. GPSC मधून नियुक्त झालेल्या सदस्यांना कोंकणीचे ज्ञान नाही, मग त्यांना नियुक्त कसे केले जाऊ शकते, असा सवाल कृष्णा पंडित यांनी व्यक्त केला आहे.

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांना लिहिलेल्या पत्रात, पंडित यांनी त्या नियुक्त सदस्याच्या कार्यमुक्तीची मागणी केली आहे, तसेच गोव्यात सेवा करत असताना ते नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात उप कुलसचिव पदावर कार्यरत आहेत, असा आरोपही केला आहे.

त्यांची जीपीएससी सदस्य म्हणून नियुक्ती निव्वळ राजकीय पक्षपातीपणा आणि जातीय विचारांवर आधारित आहे. त्याना GPSC चे सदस्य म्हणून नियुक्त करण्यासाठी कोकणी भाषेचे ज्ञान, प्रशासकीय अनुभव इत्यादींचा अभाव आहे.

त्याने जीपीएससीचे सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे की नाही याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे. यातून असे दिसून येते की नियुक्तीची प्रक्रिया सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी किंवा छाननी न करता मनमानी पद्धतीने केली आहे. असे पंडित यांनी पत्रात लिहिले आहे.

सध्याचे बिगर गोमंतकीय सदस्य पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करत नसल्याचा आरोप करून, लवकरात लवकर आवश्यक कारवाई न केल्यास नियुक्तीला आव्हान देत पंडित यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT