Anti-Tobacco Film Festival: गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे येत्या 31 मे 2023 रोजी तंबाखूविरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य दंतवैद्यकशास्त्र आणि गोवा दंत महाविद्यालय व हॉस्पिटल यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट गोव्याला धूम्रपान मुक्त करणे हा असल्याची माहिती याविषयी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.
मौखिक कर्करोग व ह्रदयविकार यांचे प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखूच्या घातक आणि वाईट परिणामांविषयी संदेश देण्यासाठी जाहिरात चित्रपटांची निवड करणे आणि या चित्रपटांचे ‘ना नफा’ तत्वावर प्रदर्शन करणे असा हेतूही या महोत्सवामागे आहे.
गोवा विभाग आणि राष्ट्रीय विभाग अशा दोन विभागांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवाची संकल्पना ‘आम्हाला अन्नाची गरज आहे, तंबाखूची नाही’ अशी आहे.
गोमंतकीय विभाग - जाहिरात फिल्म- चित्रपट कोकणी, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावा आणि त्याची निर्मिती गोमंतकीय निर्माते/निर्मिती संस्था, गोमंतकीय व्यक्ती, गोव्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी तयार केलेले असावेत.
जाहिरात फिल्म 2 मिनिटांपेक्षा जास्त अवधीचे असू नयेत, त्याला इंग्रजी उपशीर्षके असावीत.
राष्ट्रीय विभाग - जाहिरात फिल्म - चित्रपट फक्त हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावा. त्याची निर्मिती भारतीय निर्माता/निर्मिती संस्था, भारतातील व्यक्ती/विद्यार्थी आणि शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनीच तयार केलेला असावा.
पात्र व्यक्तींनी 19 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी. फॉर्म व नियम www.esg.co.in आणि www.iffigoa.org वर उपलब्ध आहेत. याला "5 वा गोवा तंबाखूविरोधी चित्रपट महोत्सव रजिस्ट्रेशन फॉर्म" असे संबोधले आहे. अर्जाची मुदत 12 मे अशी आहे.
गोमंतकीय विभागासाठी बक्षिसे अशी
पहिले - रु. 50,000/-, दुसरे - रु. 30 हजार, तिसरे - रु. 20 हजार. राष्ट्रीय विभागासाठी बक्षिसे अशीः पहिले - रु.1 लाख , दुसरे रु. 50 हजार, तिसरे रु. 30 हजार. पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा वापर सिनेमागृहे/टिव्ही चॅनल्स, शाळा, महाविद्यालये आणि अन्य सरकारी खात्यांच्या कार्यक्रमांत व इंटरनेटवर तंबाखूविरोधी जाहिरात मोहिमांसाठी करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.