Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मोठी कारवाई! म्हापशात 65 लाखांचे ड्रग्स, कुडचडेत 9 लाखांचा गांजा जप्त; मजुरांचे बिहार कनेक्शन उघड

Goa Drugs Case: म्हापसा येथे गुरुवारी पहाटे अफनान घोरी याला अटक करून त्याच्याकडून सुमारे ६५ लाख रुपये किमतीचे विविध अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अमली पदार्थविरोधी पथकाने राज्यात ड्रग्समाफियांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. म्हापसा येथे गुरुवारी पहाटे अफनान घोरी याला अटक करून त्याच्याकडून सुमारे ६५ लाख रुपये किमतीचे विविध अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने दिली.

अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती ‘एएनसी’ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अफनान घोरी (रा.म्हापसा) याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे ‘एक्स्टसी’ पावडर सापडली.

नंतर पोलिसांनी त्याच्या म्हापसा येथील घरावर छापा टाकला असता, पोलिसांना अमली पदार्थांचा मोठा साठा मिळाला. यात १२७ ग्रॅम कोकेन, एक्स्टसी पावडर आणि गांजा यांचा समावेशआहे.

जप्त केलेल्या सर्व अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित घोरी याला न्यायालयात हजर केले असता, त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हे ड्रग्स त्याने कोठून आणले आणि तो कोणाला विकणार होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.

या गुन्ह्यातील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू केली आहे. ही कारवाई ‘एएनसी’च्या पोलिस उपनिरीक्षक शाहीन शेट्ये यांनी, अधीक्षक सुनीता सावंत आणि नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

मजूर म्हणून यायचे, गांजा विकायचे

काणकोण येथे १० कोटींचा कोकेन पकडल्याने दक्षिण गोव्यात ड्रग्सचा सुळसुळाट सुरू असल्याचे सिद्ध होत असतानाच कुडचडे येथेही ९ लाखांच्या गांजासह तिघांना पकडल्याने अमली पदार्थांच्या व्यवसायाने दक्षिण गोव्यातही हात-पाय पसरल्याचे सिद्ध झाले आहे.

कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गोव्यात सुतारकाम करणारे जोगिंदर यादव, संग्राम राऊत (दोघेही उडीशा आणि उमेश यादव (उत्तर प्रदेश) यांना अटक केली. हा गांजा त्यांनी बिहारमधून आणला होता.

कुडचडेचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम आणि उमेश हे दोघेही जोगिंदर याच्याकडे कामाला असून ते तिघेही तिळामळ-केपे येथे भाड्याच्या घरात राहतात.

संग्राम आणि उमेश यांना कुडचडेतील सातेरी मंदिराजवळ मैदानावर संशयास्पदरित्या फिरताना पाहिल्यावर त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या बॅगेत गांजाची १० पाकिटे लपवून ठेवल्याचे दिसून आले. या गांजाचे एकूण वजन ९.११६ किलो एवढे असून बाजारात त्याची किंमत ९.११ लाख रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT