Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud: गोव्यात आणखी एक घोटाळा, अष्टगंधा संस्थेत 11.28 कोटींची अफरातफर; माजी संचालकासह 11 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Fraud Case: सर्व संशयित संस्थेचे माजी संचालक, सदस्य, माजी व आजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

Pramod Yadav

Goa Fraud Case

पणजी: पीर्ण - बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट सहकारी संस्थेत ११.२८ कोटींचा घोटाळा झाला असून आर्थिक गुन्हे विभागाने (EOC) संस्थेच्या माजी संचालक व सदस्यांसह ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दीड वर्षापूर्वी ही तक्रार दाखल केली होती. त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर फसवणूक व गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये रवींद्र आर. नाईक (डिचोली), दिगंबर पी. परब (डिचोली), पामोहनदास देसाई, शारदा नाईक (डिचोली), प्रकाश एल. नाईक (बार्देश), प्रकाश व्ही. नाईक (बार्देश), कृष्णा बी. हळर्णकर (शिरसई), प्रकाश ए. नाईक (बार्देश), चंद्रशेखर बर्वे (बार्देश), प्रकाश कांदोळकर (पेडणे), भारत परब (बार्देश) यांचा समावेश आहे.

हा कोट्यवधींचा फसवणुकीचा गुन्हा १४ जुलै २०२३ रोजी घडला आहे. हे सर्व संशयित संस्थेचे माजी संचालक, सदस्य, माजी व आजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

या सर्व संशयितांनी कटकारस्थान रचून हा मोठा गैरव्यवहार केला. बोगस दस्तावेज कर्जासाठी सादर करून या संस्थेकडून स्वतःच्या खात्यावर कर्ज घेतले व त्याचा वापर स्वार्थासाठी इतर सदस्यांच्या संगनमताने करण्यात आला होता.

बोगस दस्तावेजाची शहानिशा न करताच संस्थेकडून कर्जे मंजूर केली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने भादंसंच्या कलम ४०६, ४०८, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब खाली गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश जी. फडते यांनी ही तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT