गोवा ते कोलकाता जाणाऱ्या फ्लाईटला 5.30 तासांचा विलंब, 10 प्रवाशांच्या विमानतळावरच राहिले साहित्य

स्पाईसजेटचे विमान सोमवारी तब्बल साडेपाच तास उशीराने विमानतळावर दाखल झाले.
spicejet Flight To Goa
spicejet Flight To GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa to Kolkata Flight: गोव्यातून कोलकाता जाणाऱ्या फ्लाईटला सोमवारी (दि.01) साडेपाच तासांचा विलंब झाला. उशीराने का होईना विमानाने उड्डाण केले खरे पण दहा प्रवाशांचे साहित्य विमानतळावरच राहिल्याने मोठा गोंधळ उडाला.

स्पाईसजेटचे विमान सोमवारी तब्बल साडेपाच तास उशीराने विमानतळावर दाखल झाले, खराब हवामान आणि गोव्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानला विलंब झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गोव्यातून कोलकाता जाणारी स्पाईसजेट कंपनीची फ्लाईट सोमवारी (दि.01) सायंकाळी 5.30 वाजता उड्डाण घेणार होती. मात्र, फ्लाईटला साडेपाच तासांचा विलंब झाल्याने विमानाने रात्री 11.15 वाजता उड्डाण घेतले, असे एका या विमानातील प्रवाशाने इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली.

एवढेच नव्हे तर 29 डिसेंबर रोजी या कंपनीची कोलकाता येथून गोव्याला येणारी फ्लाईटने साडेतीन तास उशीराने उड्डाण घेतले होते, असेही या प्रवाशाने सांगितले.

दरम्यान, रात्री मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता जेव्हा फ्लाईट कोलकता येथे दाखल झाली तेव्हा प्रवासी त्यांच्या सामानाची वाट पाहत थांबले होते. मात्र, एक तासानंतर त्यांचे सामान विमानतळावरच राहिल्याचे त्यांना सांगण्यात आले.

एका प्रवाशांने याबाबत वरिष्ठांशी संपर्क करुन साहित्य विसल्याची माहिती दिली. कंपनीने मात्र, तांत्रिक बिघाडामुळे बॅगा येण्यास विलंब झाला असे कारण सांगितले. तसेच, गोव्यातून कोलकातासाठी तात्काळ फ्लाईट नसल्याने बुधवारी साहित्य पोहोचेल असे कंपनीने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com