Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grabbing: जमिन हडप प्रकरणात एसआयटीकडून आणखी तिघांना अटक

पुरातत्व खात्यातीत दोघांसह एका व्यावसायिकाचा समावेश

Akshay Nirmale

Goa Land Grabbing: गोव्यातील जमिन घोटाळा प्रकरणात एसआयटीने आणखी तिघांना अटक केली आहे. यात पुरातत्व खात्यातील कर्मचारी महेश नाईक आणि धीरेश नाईक यांचा समावेश आहे. तर फोंडा येथील व्यावसायिक अनिल नाईक यालाही एसआयटीने अटक केली आहे. महेश नाईक पुरातत्व खात्यात बाईंडर म्हणून कार्यरत आहे.

महेश मड्डू नाईक हा मडकईचा रहिवासी आहे. तर दिनेश गंगाराम नाईक आणि अनिल आनंद नाईक हे दोघेही फोंड्यातील बांदोडा येथील रहिवासी आहेत. जमिनीचा मालकी हक्क बदलण्याच्या व्यापक कटात या तिघांचाही समावेश आहे. कळंगुट येथील सर्व्हे नंबर 26/9 आणि 466/2 येथील जमिनींच्या मालकी हक्कात त्यांनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे फेरफार केल्याचा आरोप आहे. दिनेश आणि महेश हे पुरातत्व खात्यातले कर्मचारी आहे. पैकी दिनेश याला यापुर्वीही जमिन घोटाळा प्रकरणात अटक झाली होती.

बोगस दस्तावेजद्वारे राज्यातील जमीन विक्री करणाऱ्या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी केली जात आहे. एसआयटीने अनेक दलालांना आत्तापर्यंत गजाआड केले आहे. बार्देशचा तत्कालीन मामलेदार राहुल देसाई याला एसआयटीने अटक केली होती. देसाई याला निलंबितही केले गेले आहे. राहुल देसाई, त्याच्या कार्यालयातील चालक योगेश वझरकर आणि पुरातत्व खात्यातील दोघांना अटक झाली होती.

तसेच एसआयटीने आसगाव येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी माजी उपनिबंधक प्रेमानंद देसाई याला अटक केली आहे. प्रेमानंद देसाई हे पणसुले, काणकोण येथे उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. यापुर्वी या प्रकरणातील संशयित तीन मास्टरमाईंड्स पैकी एक असलेल्या राजकुमार मैथी याला अटक झाली आहे. मैथी याला बेकायदा जमीन हडप प्रकरणात चौथ्यांदा अटक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT