Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Accident: अपघाताचे सत्र सुरूच, दाबोळीत वेल्स जंक्शनला कार धडकली

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मागील तीन दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. झुआरी अपघातानंतर आज सकाळी चिखली येथे झालेला अपघात आणि आता दाबोळीत वेल्स जंक्शनला कार धडकून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वेल्स जंक्शनवरील सिग्नलला धडकून हा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून, सिलव्हर रंगाची स्विफ्ट कार अपघआतग्रस्त अवस्थेत दिसून येत आहे. तसेच, सिग्नल देखील कोलमडून पडल्याचे दिसत आहे. (Another car accident at Dabolim, on airport road)

दाबोळी आंतरराष्ट्रिय विमानतळ रस्त्यावर हा अपघात झाला आहे. अपघाताची वेळ आणि कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच, या अपघातात किती लोक जखमी झाले आहेत हे देखील अस्पष्ट आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री झुआरी पुलावरून नदीत कार कोसळली, त्यात चार लोकांनी आपला जीव गमावला. बारा तासांच्या शोध मोहिमेनंतर ही कार नदीतून बाहेर काढण्यात आली. तर आज (शुक्रवारी) पहाटे चिखलीतील रिमा बारजवळच असलेल्या सांडपाण्याच्या पुलावरुन कार नाल्यात कोसळली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

Goa Live News: बिबट्याच्या हल्ल्यात निवृत्त बँक अधिकारी जखमी

SCROLL FOR NEXT