Gold Theft in Canacona Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: घरफोडीचे सत्र थांबेना; आरगाव, लोटली येथे दागिन्यांसह दोन लाखाचा ऐवज लांबवला

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चोरी,मारामारी, यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक दिवशी ठरल्याप्रमाणे खुन, मारामारी, अपघात यात गोमंतकीय आपले नुकसान सहन करतायेत. या पार्श्वभूमीवर दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री आरगाव, लोटली येथे बंद घर फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

(An unknown thief has stolen two lakhs from a house in Lotli)

मिळालेल्या माहितीनुसार आरगाव, लोटली येथे घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ती फोडली आहेत. यात चोरट्यांनी 1.65 लाखांच्या रोक रक्कमेसह सुमारे 1.85 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यात सोन्याचे, चांदीचे दागिने ही चोरट्याने पळवले आहेत. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. लवकरच संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळेल असे पोलिसांनी माहिती देताना म्हटले आहे.

दरम्यान अशाच प्रकारचा घरफोडीचा प्रकार वाठादेव - सर्वण डिचोली इथे काही दिवसांपुर्वी घडल्याचे उघड झाले आहे. यात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल 5.44 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत असल्याचे म्हटले असले तरी हा शोध अद्याप संपलेला नाही. त्यामुळे नागरिकात आता घबराटीचं वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT