Goa Crime Cases: गोव्यात वाढली गुंडगिरी, पोलिसांचा धाक संपला का?

Goa Crime Cases: गोव्यात भररस्त्यात दोन गटात हाणामारी, पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे स्पष्‍ट झाले आहे.
Goa Crime Cases
Goa Crime CasesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime Cases: मडगाव आणि परिसरात गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले आहे. कोलवा सर्कलजवळ गुंडांच्या एका गटाने भररस्त्यात अन्य एका गुंडाला केलेल्या मारहाणीमुळे त्‍यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे स्पष्‍ट झाले आहे. हे दोन्ही गट अचानक एकमेकासमोर आल्याने आणि एकाने दुसऱ्या गटाकडे रागाने पहिले असल्याच्‍या वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता फातोर्डा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे. या परिसरात दोन्‍ही गटांच्‍या गुंडांना आपले वर्चस्व कायम राखायचे होते आणि त्यातूनच कोलवा सर्कलजवळ कुख्यात गुंड विजय कुलाल याच्‍यावर हल्ला झाला आहे काय, याची पडताळणी करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी सांगितले.

Goa Crime Cases
Goa Tourism:'रिडिस्कव्हर गोवा'; पर्यटकांसाठी डिसेंबरमध्ये Airbnb आणि पर्यटन खात्याचा अनोखा उपक्रम

या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी दुसऱ्या गटातील अफझल हुसेन शेख (26), रिहान अहमद व कृष्णा लोहार (21) या तिघांना अटक केली आहे. आणखी तिघेजण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कोलवा सर्कलजवळ मारहाण करण्यात आलेल्या विजय कुलाल याच्या नावावर स्थानिक पोलिस स्थानकात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

त्‍यामुळे या परिसरात स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्‍यान, विजय कुलाल या गुंडाला नग्न करून जबर मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने तिन्ही संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुंड अन्वरवरही झाला होता हल्ला

15 फेब्रुवारी 2021 ला रोजी दुपारी एकच्‍या सुमारास आर्लेम जंक्शनजवळ एका व्यक्तीवर खुनी हल्ला झाल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक कपिल नायक सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी गेले असता एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळली.

चौकशीअंती जखमी व्यक्ती ही मडगाव पोलिस स्थानकात विविध गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड अन्वर शेख असल्याचे स्‍पष्‍ट झाले होते. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी सावर्डे येथील रिकी होर्णेकर याच्‍यासह आणखी दोघांना अटक केली होती. हा हल्लाही पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

मडगाव आणि परिसरात गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले आहे. कोलवा सर्कलजवळ गुंडांच्या एका गटाने भररस्त्यात अन्य एका गुंडाला केलेल्या मारहाणीमुळे त्‍यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे स्पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Goa Crime Cases
Goa Crime News: गोव्यात महिला क्रीडा अधिकाऱ्याचा छळ!

मुक्तियार बदानीचा सपासप वार करून खून : मडगाव येथील आझादनगरी येथे मुक्तियार बदानी (21) याचा वाढदिवस साजरा करत असताना 14 जुलै 2022च्या रात्री आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले होते. या हल्‍ल्‍यात गंभीर मार लागल्याने बदानी याचा मृत्‍यू झाला होता.

महेश आमोणकर, मडगाव नगरसेवक-

काही वर्षांपूर्वी मडगाव येथील खारेबांध या परिसरात गुंडांचा वावर होता. त्‍यात स्थानिकांचा समावेश नव्हता. काही परप्रांतीय गुंड प्रवृत्तीचे लोक येथे धिंगाणा घालत असत. कोलवा सर्कलजवळ एका गुंडाला नग्न करून झालेली मारहाण ही निंदनीय आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com