Amthane Dam Overflow Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Amthane Dam 50 metre water level: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आमठाणे जलाशयातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आमठाणे जलाशयातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत जलाशयातील पाण्याची पातळी ५० मीटरपर्यंत पोहोचली असून, तुडुंब भरण्यासाठी आता केवळ दोन मीटर पाण्याची वाढ आवश्यक आहे. पुढील सात-आठ दिवस सलग जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास आमठाणे जलाशय ‘फुल्ल’ होण्याची शक्यता जलस्रोत खात्याने व्यक्त केली आहे.

जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जलाशयातील पाण्याची पातळी वाढली होती. जुलैअखेर ती ४८.५ मीटरपर्यंत पोहोचली होती. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये पाण्याच्या पातळीत दीड मीटरने वाढ झाली होती. त्यानंतर गेल्या २२ दिवसांत झालेल्या पावसामुळे पुन्हा दीड मीटरने वाढ होऊन पाण्याची पातळी आता ५० मीटरवर पोहोचली आहे.

मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात असलेल्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर असून, धरणाची कमाल पाणीपातळी ५२ मीटर आहे. धरणावरील सर्व्हिस गेटसह दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर गेल्या जानेवारीत जलसाठ्याची पातळी नियंत्रित करण्यात आली होती. त्यानंतर मात्र पाण्याची पातळी घटल्याने जलाशयाचे सभोवतालचे पात्र कोरडे पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT