Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

Bison In curti: कुर्टी - फोंड्यात गव्यांचा कळप मुख्य महामार्गावर सातत्याने दिसू लागल्याने लोकांच्या मनात धडकी भरली आहे.
Bison In Goa
Bison In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुर्टी - फोंड्यात गव्यांचा कळप मुख्य महामार्गावर सातत्याने दिसू लागल्याने लोकांच्या मनात धडकी भरली आहे. हे गवे बिनधास्तपणे मुख्य रस्त्यावरून हिंडत असून रस्त्याच्या कडेला चरत फिरत असल्याने त्यांच्यापासून धोका निर्माण झाल्याची भावना मुख्य म्हणजे दुचाकीस्वारांत निर्माण झाली आहे. कालच कुर्टी - बेतोडा बगल रस्त्याच्या तिठ्यावरच नऊ गवे चरत असल्याचे दिसल्याने लोकांनी भीती व्यक्त केली आहे.

फोंड्यातील कुर्टी, बेतोडा, ढवळी आणि खांडेपार भागात गव्यांचा मुक्त संचार असून कोणत्याही क्षणी हे गवे मुख्य रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला आहे. चार दिवसांपूर्वी कुर्टी - बेतोडा बगल रस्त्यावरून अचानक जाणाऱ्या चार गव्यांच्या कळपाने एका दुचाकीस्वार महिलेला ठोकर दिल्याने ती जखमी झाली होती.

कुर्टी - बेतोडा बगल रस्ता हा वन्यप्राण्यांचा कॉरिडॉर असून त्यांना रस्ता पार करण्यासाठी तसे नियोजन करण्यात आले आहे. वन खाते गव्यांपासून लोकांना सुरक्षितता मिळावी यासाठी वेळोवेळी गस्त घालत आहे.

कुर्टी भागात रात्रीच्या वेळी संचार करणाऱ्या गव्यांचा धोका दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना अधिक संभवत आहे. महिन्याभरापूर्वी कुर्टीतील गृहनिर्माण वसाहतीकडून रात्रीच्यावेळी तीन गवे रस्त्यावरून जाताना सीसीटीव्हीत दिसले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कामावरून दुचाकीने घरी परतणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन यावे - जावे लागते.

Bison In Goa
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

जिकडे तिकडे झाडे आणि डोंगर कापून मोठमोठी बांधकामे हाती घेतली जात असल्याने हे गवे आता लोकवस्तीत येऊ लागले आहेत. राने उद्ध्वस्त करण्याच्या या प्रकारामुळे गव्यांसह बिबटे आणि इतर हिंस्त्र प्राणी लोकवस्तीत शिरत असल्याने लोकांना धोका निर्माण झाला आहे. - जयराज नाईक (प्राणीमित्र, कुर्टी)

Bison In Goa
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

गव्यांचा हैदोस कुर्टी व इतर भागात सुरू असून लोकांची बागायती उद्ध्वस्त करण्याबरोबरच लोकांवर हल्ले करण्याचे प्रकारही या गव्यांकडून घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी नऊ गवे कुर्टीतील मुख्य रस्त्यावर फिरत असताना मी स्वतः पाहिले होते. या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे. - संदीप पारकर (प्राणीमित्र खांडेपार)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com