Amit Shah, Arvind Kejariwal Dainik Gomantak
गोवा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अरविंद केजरीवाल येणार गोव्यात! ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ; पक्ष विस्तारासाठी आपच्या बैठका

Amit Shah Arvind Kejriwal Goa News: अमित शहा हे ‘माझे घर’ योजनेच्या शुभारंभासाठी येणार आहेत, तर अरविंद केजरीवाल हे पक्षाच्या बैठकांसाठी दोन दिवस गोव्यात दाखल होणार आहेत.

Sameer Panditrao

पणजी: राष्ट्रीय स्तरावरील दोन वरिष्ठ नेते गोव्यात ४ ऑक्टोबर रोजी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे ‘माझे घर’ योजनेच्या शुभारंभासाठी येणार आहेत, तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे पक्षाच्या बैठकांसाठी दोन दिवस गोव्यात दाखल होणार आहेत.

राज्यातील अनधिकृत घरे कायदेशीर नोंदणी देण्यासाठी सरकारने ‘माझे घर’ योजना राबविली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि कायदेशीर निवासाची हमी मिळणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हा अभिनव निर्णय असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली होती.

या योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असून, हा कार्यक्रम डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. शहा यांचा त्या दिवसाचा दौरा लवकरच सरकारतर्फे अधिकृतरित्या जाहीर होणार आहे.

‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हेही ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी गोव्यात आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा पंचायत निवडणुकांपूर्वी पक्ष विस्ताराचा आढावा घेणार आहेत. उत्तर गोव्यात म्हापसा, तर दक्षिण गोव्यात कुडतरी येथे केजरीवाल कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतात DPDP कायदा लागू, Social Mediaवरील नियम अधिक कठोर होणार, काय बदल होतील? जाणून घ्या

Pooja Naik: पुलिस आमचें Useless, 'त्या' तपास अधिकाऱ्यावरच 5 लाचखोरीचे गुन्हे; तपास कसा होणार? विजय सरदेसाई संतापले

Rishabh Pant: ऋषभ पंतचा 'पॉवर शो'! 102 मीटरचा षटकार ठोकत बनला नवा 'सिक्सर किंग', सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक Watch Video

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

SCROLL FOR NEXT