Arvind Kejriwal Goa Visit: अरविंद केजरीवाल यांचा नियोजित गोवा दौरा रद्द; भारत - पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

India Pakistan War: सध्या सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी गोवा दौरा रद्द केला आहे.
Arvind Kejriwal Goa Visit | Aam Admi Party
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नियोजित गोवा दौरा रद्द केला आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते सांता क्रूझ येथील आरोग्य केंद्राचे उद्धाटन होणार होते. तसेच, केजरीवाल लईराई देवीचे दर्शन देखील घेणार होते. पण, केजरीवाल यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती गोव्याचे आप नेते अमित पालेकर यांनी दिली आहे.

अरविंद केजरीवाल सांताक्रूझ येथील आरोग्य केंद्राचे उद्धाटन करणार होते. यासाठी शुक्रवारी रात्री केजरीवाल गोव्यात हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी गोवा दौरा रद्द केला आहे.

केजरीवाल या दौऱ्यात लईराई देवीच्या दर्शनाला देखील जाणार होते. याच ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता.

Arvind Kejriwal Goa Visit | Aam Admi Party
India Pakistan War:भारत-पाक युद्ध झाल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता; कोणाला बसणार मोठा फटका?

अमित पालेकर यांनी याबाबत एक्सवरुन माहिती दिली आहे. सध्या देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर १० मे सायंकाळी ०५ वाजता आयोजित आमचे आरोग्य पॉलिक्लिनिकच्या उद्धाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पण, आरोग्य सेवेचे काम सुरुच राहील, असे पालेकरांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal Goa Visit | Aam Admi Party
Goa Stampede: लईराई जत्रोत्सवात योग्य काळजी घेतली असती तर..? गोव्यातील वाढते घात-अपघात ही ज्वलंत समस्या

श्री लईराईला देणार होते भेट

अरविंद केजरीवाल गोव्यात आल्यानंतर शिरगावातील आई लईराई देवस्थानला भेट देऊन दर्शन घेणार होते. याच ठिकाणी वार्षिक जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरी सहा भाविकांचा मृत्यू झाला होता. रात्रीच्या सुमारास अचानक धावपळ झाली आणि सहा जणांचा मृत्यू होऊन अनेकजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com