Vishwajit Rane: विश्‍वजीत राणेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; महाराष्‍ट्रातील निवडणुकीविषयी ‍चर्चा

Vishwajit Rane Delhi Visit: आरोग्यमंत्री राणे यांनी दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली
Vishwajit Rane Delhi Visit: आरोग्यमंत्री राणे यांनी दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली
Amit Shaha|Vishwajit Rane Twitter
Published on
Updated on

पणजी: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्ली दौऱ्यात शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राणे यांच्याकडे सध्या महाराष्‍ट्रातील विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभा अधिवेशनाच्या काळातही राणे यांनी अचानकपणे केलेल्या दिल्ली दौऱ्यावेळी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शहा यांची भेट घेतली होती. राणे यांच्याकडे यापूर्वी मध्यप्रदेश व कर्नाटकातील विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी भाजपने सोपवली होती. आता महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारी दिली आहे.

Vishwajit Rane Delhi Visit: आरोग्यमंत्री राणे यांनी दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली
Vishwajit Rane: अवैध डोंगर उत्खननावर 25 लाखांपर्यंत दंड ठोठावण्यासाठी कायद्यात सुधारणा

‘या’ कारणामुळे दौरा महत्त्वपूर्ण

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची भाजपशी युती असल्याने कोकण प्रांतातील राजकारण थोडे संवेदनशील बनले आहे. या पार्श्वभूमीवर विश्‍वजीत राणे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi targets Amit Shah
Goa ST Political Reservation
Student Protest Police Lathicharge
Amit Shah, BL Santosh Goa visit
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com