Goa Politics | Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

'PM Rojgar Mela' नियुक्तीवरुन अमित पाटकर यांनी सरकारवर साधला निशाणा

''सरकारने गोव्यातील बेरोजगार तरुणांना कधी, कसे निवडले हे सांगणे आवश्यक''

दैनिक गोमन्तक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज देशातील 75 हजार उमेदवारांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे दिली आहेत. यामध्ये गोवा राज्यातील 25 जणांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावरुन गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

(Amit Patkar said CM Pramod Sawant must make public details of persons recruited through PM Rojgar Mela)

मिळालेल्या माहितीवरुन पाटकर म्हणाले की, गोवा राज्यात रोजगार मेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्रे दिली आहेत. त्यांची माहिती सार्वजनिक करावी, तसेच राज्य सरकारने दिलेली नियुक्ती कोणत्या आधारावर दिली आहे, सरकारने गोव्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना, उमेदवार कधी, कसे आणि कोणी निवडले हे सांगणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करावी म्हणजे वस्तुस्थिती लोकांसमोर येईल असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

पुढे बोलताना पाटकर म्हणाले, मला कळले आहे की, टपाल खात्यासाठी काही लोकांची भरती झाली आहे. यात आठ ते दहा वर्षे काम केल्यांना अचानक सेवेतून काढले आहे. या सात पोस्टमनचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. यावर गोवा सरकार काय उत्तर देते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT