Honda:'पेपर मिल कंपनी'चे प्रदुषण बंद करा; ग्रामस्थ संतप्त

''पेपर मिल कंपनीमुळे जनता प्रदुषणाने त्रस्त''
Gram Sabha
Gram Sabha Dainik Gomantak

पिसुर्ले: होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या सुक्राप्ट पेपर मिल कंपनीमुळे होंडा व इतर परिसरातील जनतेला प्रदुषणाला सामोरे जावे लागते आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे असा मुद्दा उपस्थित करून पंचायतीच्यावतीने पुढाकार घेऊन या कंपनीचे प्रदुषण त्वरित बंद करावे अशी जोरदार मागणी आज दि 23 रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली.

(A Gram Sabha was held at honda and mollem harvalem pissurlem citizens many issues were discussed)

Gram Sabha
MLA Antonio Vaz: कुठ्ठाळीतील पाणी समस्या सोडवणार

यावेळी नागरिकांनी सदर कंपनीचे उत्पादन प्रक्रिया सुरू असताना कर्णकर्कश आवाज व जिवघेणा वास सर्वत्र पसरत असल्याने होंडा पंचायतीचे सर्व प्रभाग, पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील काही भाग, हरवळे, मोर्ले या भागातील जनतेच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली, गेल्या दोन तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, उग्र स्वरूपाचा वास येत असल्याने नागरिकांना घरांची दारे व खिडक्या बंद करून लॉकडाऊन अवस्थेत दिवस काढावे लागतात असा मुद्दा बाराजणकर यांनी उपस्थित केला.

Gram Sabha
Goa First: गोवा शिपयार्डची 'ती' भिंत हटवणे आवश्यक

सदर कंपनीच्या प्रदुषणाचा त्रास पिसुर्ले येथिल विद्यालय तसेच शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना होत आहे, त्यामुळे मुले आजारी पडण्याची प्रमाण वाढले असल्याचे मत शिक्षक भैरू झोरे यांनी उपस्थित केला. सदर कंपनीमूळे या परिसरातील विहिरीतील पाणी प्रदुषित झाले असल्याचे पोस्तवाडा भागातील काही नागरिकांनी उपस्थित केला. त्यामुळे सदर प्रदुषणाचा धोका लक्षात घेऊन होंडा पंचायत मंडळाने पुढाकार घेऊन सदर कंपनीवर कायदेशीर कारवाई करून सदर प्रदुषण बंद करावे अशी जोरदार मागणी केली.

त्याप्रमाणे होंडा परिसरातील दुकाने परप्रांतीयांच्या ताब्यात जात आहे, त्याचा परिणाम स्थानिक दुकानदारांवर होत आहे, या संबंधी पंचायतीने परप्रांतीयांना दुकाने चालण्याचा परवाना देऊ नये अशी मागणी होंडा तिस्क भागातील काही दुकानदारांनी केली. होंडा पंचायतीचा कारभार गेल्या काही वर्षांपासून होंडा बसस्थानकावरील अपुऱ्या जागेतून चालत आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याच प्रमाणे ग्रामसभा किंवा इतर स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यास अडथळा निर्माण होत आहे , याची दखल घेऊन पंचायतीचा कारभार नवीन इमारती मधून सुरू करावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सुरवातीला सरपंच शिवदास माडकर यांनी स्वागत करुन नागरिकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन, कंपनीचे प्रदुषण बंद करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, त्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सह्या मारून निवेदन द्यावे असे सांगितले. पंचायतीचे सचिव मुला वरक यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून पंचायतीतर्फे सुरू असलेल्या व नियोजित कामांची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com