CM Pramod Sawant: केंद्राच्या योजना खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये नेतृत्व तयार होण्याची गरज

केंद्र सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक त्या प्रमाणात पोहोच नाहीत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

केंद्र सरकारच्या योजना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक नेतृत्व तयार होणे गरजेचे बनले आहे. कारण केंद्र सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक त्या प्रमाणात पोहोचत नाहीत. अशी खंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली उत्तर गोव्यातील एका कंपनी ​​उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

(CM Pramod Sawant said need to have more farmer leaders so that the government schemes would reach villages)

CM Pramod Sawant
Honda:'पेपर मिल कंपनी'चे प्रदुषण बंद करा; ग्रामस्थ संतप्त

सावंत म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपनीचा उदय हा शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. शेतकऱ्यांना त्यांची स्वतःची कंपनी उभारल्याखेरीज लाभ मिळू शकणार नाही.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक फायदे दिले आहेत. भविष्यात राज्यात किमान 12 शेतकरी उत्पादक कंपन्या असतील. “नाबार्ड आणि राज्याच्या कृषी विभागाने या कंपन्या सर्व तालुक्यांमध्ये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

CM Pramod Sawant
Honda:'पेपर मिल कंपनी'चे प्रदुषण बंद करा; ग्रामस्थ संतप्त

शेतकऱ्यांनी योजनांबाबत जागरूक राहून त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यातील नेतृत्व तयार होणे शेतकऱ्यांच्या अधिक फायद्याचे आहे. यामुळे त्यांना अधिक नफा कमावता येऊ शकतो. त्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे मांडले जाऊ शकतील, त्यामूळे शेतकऱ्यांनी याचा विचार करत आपल्यातील नेतृत्व पुढे येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com