Congress press conference  Dainik Gomantak
गोवा

‘गोवा जोडू या, एकसंध राहू या’

अमित पाटकर : नवसंकल्प शिबिरात दिला नारा

दैनिक गोमन्तक

पणजी : देशासह गोव्यातही ध्रुवीकरण वाढत असल्याने धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने घेतलेल्या दोन दिवसीय नवसंकल्प शिबिरात ‘गोवा जोडू या, एकसंध राहू या’, असा नारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला. (Amit Patkar press conference Congress goa)

पणजी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोबत पक्षाचे प्रवक्ता कॅ. विरियातो फर्नांडिस, पक्षाचे नेते एल्विस गोम्स, नेते ॲड. श्रीनिवास खलप, महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक आणि युवा काँग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर उपस्थित होते.

नवसंकल्प शिबिरात प्रामुख्याने 2024 लोकसभा आणि 2027 गोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात सर्व 40 मतदारसंघामध्ये बूथ स्तरापासून पक्ष संघटनेची बांधणी केली जाईल. 2024 लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे लक्ष, तसेच 2027 गोवा विधानसभा निवडणुकीत किमान 27 जागा जिंकण्यासाठी धोरणात्मक तयारी केली जाणार आहे. तर, अनुसूचित जाती आणि जमाती, इतर मागासवर्गीय समुदायांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जाणार नाही याची काळजी पक्ष घेणार आहे, असे पाटकर यांनी स्‍पष्ट केले.

मोदी सरकारने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेल्या नोटिसीबद्दल सरकारच्या कृतीविरोधात ठराव घेतला आहे, अशी माहिती ॲड. श्रीनिवास खलप यांनी दिली.

भाजपात आंतरिक कलह : सरकार पक्षात आणखी पाच आमदारांची भर पडणार असे विधान गोवा भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केले होते. परंतु, भाजपमध्ये सध्या आंतरिक कलह सुरू असल्यानेच अशा प्रकारची विधाने करत आहेत, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमिती पाटकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT