‘मोपा’ विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना नाममात्र नोकऱ्या

बाहेरील लोकांनाच काम : उमेदवारांची नावे जाहीर करण्याची मागणी
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मोपा विमानतळ प्रकल्पात आतापर्यंत दिलेल्या सुमारे पाचशे नोकऱ्या केवळ पेडणे तालुक्यातील व्यक्तींना दिल्या आहेत का अशी चर्चा सध्या पेडणे तालुक्यात सुरू आहे. त्या नोकऱ्या बहुतांश प्रमाणात पेडणे तालुक्याच्या बाहेरील लोकांनाच देण्यात आल्याचा दावा या विमानतळासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. (Goa Mopa airport jobs)

Mopa Airport
गोव्यात 35 सरकारी शाळांचा 100 टक्के निकाल

विमानतळासाठी स्वत:च्या जमिनी उपलब्ध करून दिलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तेथील नोकऱ्या प्राधान्यक्रमाने मिळायलाच हव्या, असे मत व्यक्त करून, ज्या व्यक्तींना नोकऱ्या दिल्या आहेत, त्यांची नावे त्यांच्या गावांसह सरकारने जाहीर करावीत, असे उघड आव्हान त्या शेतकऱ्यांनी दिले आहे.

मोपा विमानतळासाठी मोपा गावापेक्षा कासारवर्णेतील शेतकऱ्यांची जमीन जास्त प्रमाणात वापरण्यात आली आहे. परंतु, विमानतळासाठी नाव मात्र मोपाचे मिळाले आहे. विमानतळासाठी जमीन गमावलेल्या व्यक्तींना त्यासंदर्भातील प्रमाणपत्रही सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे, जमीन गमावलेल्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता अतिशय धुसर झाली आहे.

कासारवर्णे येथील शेतकरी बाबूराव गाड यासंदर्भात म्हणाले, ‘‘की आमचीच एक लाख पंचवीस हजार चौरस मीटर जमीन आम्ही विमानतळासाठी उपलब्ध करून दिली आहे. ती जमीन आमच्या पूर्वजांच्या नावावर आहे व आम्ही त्यांचे वारसदार आहोत. आम्हाला यासंदर्भात सरकारकडून कोणताही आर्थिक मोबदला मिळालेला नाही व त्यामुळे आमचा पैसा अडकून राहिला आहे. आम्ही सध्या यासंदर्भात न्यायालयीन लढाई लढत आहोत.’’

Mopa Airport
सत्तरी तालुक्यातील अनेक शाळांचा विक्रमी निकाल

उगवे येथील शेतकरी सुबोध महाले यांनी दावा केला, की विविध कामे एजन्सीच्या माध्यमातून केली जातात व त्या एजन्सी पेडणेवासीयांची नियुक्ती त्या पदांवर करण्याऐवजी स्वत:ची माणसे तिथे नियुक्त करीत असतात. विमानतळासाठी जमिनी गवमावलेल्या माणसांचा मुद्दा त्या एजन्सी विचारातच घेत नाहीत, असा दावाही महाले यांनी केला. कासारवर्णे येथील उदय जयराम महाले म्हणाले, ‘‘पेडणेवासीयांना आजपर्यंत ज्या नोकऱ्या या प्रकल्पात मिळालेल्या आहेत त्या केवळ चपरासी व सुरक्षारक्षक अशा निम्नस्तरावरील आहेत. सरकारने पेडणेवासीयांना शंभर टक्के नोकऱ्या दिलेल्याच नाहीत व त्याबाबत खोटी वक्तव्ये करून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करीत आहेत.’’

या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या वेळी दोनशे फायर फायटर्सना प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु. सरकारने त्यांना मोफत प्रशिक्षण दिले नाही. त्या प्रशिक्षणार्थींनी स्वत:चे पैसे भरून ते प्रशिक्षण घेतले. त्यापैकी भाजपचे प्रतिनिधित्व करणारे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांचे पुतण्या तथा माजी आमदार अनंत शेट यांच्या पुत्राची एका महत्त्वपूर्ण विभागाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे, असे मोपावासीयांचे म्हणणे आहे.

रोजगाराबाबत मोपा विमानतळ प्रकल्पात सामावून घेण्यासाठी पेडणेवासीयांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. तथापि, त्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी दोन लाख छत्तीस हजार रुपये भरून प्रशिक्षण घ्यावे लागले, ही बाब उघडकीस आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com