Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

'पुढील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस गोव्यात 27 जागा जिंकणार'

GPCC अध्यक्ष अमित पाटकर यांनी कॉंग्रेस 27 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा काँग्रेस पुढील विधानसभा निवडणुकीत 27 जागा जिंकणार असल्याचा दावा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. याचबरोबर लोकसभेच्या दोन जागा देखील कॉंग्रेसला मिळतील, असे ते म्हणाले.

अमित पाटकर यांनी गुरुवारी सांगितले की, “आम्ही सर्व 40 विधानसभेच्या जागांना लक्ष्य करत आहोत.” पाटकर नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय ‘नव संकल्प शिबिर’ नंतर पत्रकारांना भेटले. “काँग्रेस पक्ष 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 40 मतदारसंघांना लक्ष्य करेल आणि निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेपूर्वी उमेदवार घोषित करेल,” असे अमित पाटकर म्हणाले.

'नव संकल्प शिबिर' मध्ये मंजूर झालेल्या ठरावांबद्दल माहिती देताना, GPCC सचिव श्रीनिवास खलप म्हणाले, "2024 मध्ये दोन्ही लोकसभेच्या जागा आणि 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत 27 जागा कॉंग्रेस जिंकेल."

मोदी सरकारकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत खलप म्हणाले की, "सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस पाठवण्याच्या मोदी सरकारच्या राजकीय हेतूने प्रेरित कृतीचा निषेध करण्याचा ठराव ‘नव संकल्प’ कार्यशाळेत मंजूर करण्यात आला आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT