केपेत तांब्याची भांडी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

Thief Arrested in Goa : सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांची भांडी जप्त करण्यात आली आहेत.
Thief Arrested in Goa
Thief Arrested in GoaDainik Gomantak

केपे : केपे पोलिसांनी तांब्याची भांडी चोरणाऱ्या विजय जलिगिरी (सांजुझे द अरिएल-कुडतरी) व राम सिंग (कोंबा-नेसाय) यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांची भांडी जप्त करण्यात आली आहेत.

Thief Arrested in Goa
शुगर बनारसे, सोफिया शर्मा यांना राष्ट्रीय सर्फिंग स्पर्धेत सुवर्णपदक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून केपे भागातील तांब्याची भांडी चोरी होण्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी तपासात काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज घेतली होती. त्याच्या मदतीने दोघांनाही पकडण्यास यश आल्याचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी सांगितले.

सध्या भात पीक कापण्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात लोक भात उकडण्यासाठी तांब्याच्या मोठ्या भांड्याचा उपयोग करतात. ही भांडी बाहेर अंगणातच ठेवलेली असतात. विजय व राम हे दोघेही गवंडी काम करत असून काम करण्याच्या ठिकाणी ते रेकी करून रात्रीच्या वेळी भांडी चोरून नेत होते, असे तपासात उघड झाल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

सदर चोरी केलेली चार मोठी भांडी व दोन इतर भांडी त्यांनी कुडतरी येथील एका भंगार अड्ड्यावर विकली होती. ती पोलिसांनी जप्त केली असून, भंगारअड्ड्याच्या मालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com