Hunger strike 5thday: Amit Palekar health deteriorated Dainik Gomantak
गोवा

Palekar Hunger Strike 5th Day: पालेकरांची प्रकृती खालावली; पाहा मेडिकल अपडेस्ट

भर पावसातही उपोषण सुरूच, ‘आप’च्या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

पणजी: जुने गोवा (Old Goa) येथे गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण करीत असलेले आपचे (AAP) नेते ॲड.अमित पालेकर (Amit Palekar) यांची प्रकृती खालावली आहे. आज या उपोषणाला पाचवा दिवस उजाडला आहे. आज सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी (Medical Updates) करण्यात आली. यावेळी त्यांचा रक्तदाब वाढल्याचे तसेच त्यांची ऑक्सिजनची पातळीदेखील खालावल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. सरकारकडून केवळ कागदी घोडे नाचविले जात असून या सरकारला (Goa Government) कुणाच्याच जीवाची पर्वा नाही, असा आरोप होऊ लागला आहे.

जुने गोवा येथील जागतिक वारसास्थळ असलेल्या कॅजीटन चर्चच्या परिसरातील अवैध बांधकाम पाडले जावे, यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून साखळी आंदोलन सुरू आहे. याचदरम्‍यान गेल्या चार दिवसांपासून आपचे नेते पालेकर यांनी उपोषण सुरू केले आहे. दोन दिवसांपासून पाऊस असतानाही त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही.

समर्थनात स्वाक्षरी मोहीम, 30 हजार नागरिकांचा पाठिंबा

पालेकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपने स्वाक्षरी मोहिम राबविली. गुरुवारी सायंकाळपर्यंत 30 हजार लोकांनी त्यांना स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दर्शविला आहे. दाबोळी, फोंडा, कुठ्ठाळी, हळदोणे, वास्को याठिकाणी ही मोहिम राबविण्यात आली. त्यासाठी आपचे उपाध्यक्ष कॅ.व्हेंजी वियेगास यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, आपचे संयोजक राहुल म्हांबरे, महादेव नाईक, क्रुझ सिल्वा, बाप्पा कोरगावकर, प्रा. राजेश कळंगुटकर यांनी पालेकरांची भेट घेतली.

कुठल्याच वादळाची पर्वा नाही

दरम्यान, गोवा आपनेदेखील याबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. वादळ कितीही तीव्र असो, कितीही पाऊस कोसळूदेत, बेफाम वारे वाहुदेत, आमची माघार नाही, आम्ही गोवेंकरांसाठी लढत राहू, असे ट्विट पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर करण्यात आले आहे. पावसातदेखील हे आंदोलन जोमाने सुरू असून त्या राज्यभर पडसाद उमटत आहेत. गेंड्याची कातडी पांघरलेले सरकार मात्र मुग गिळून गप्प आहे. परवाने रद्द करण्याचे कागदी घोडे नाचवून बांधकाम अवैध असल्याची कबुली दिली असताना बांधकाम का पाडत नाही, असा सवाल आता आंदोलकांमधून होत आहे.

केजरीवालांचा हल्लाबोल

भाजप, कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डने गोवा राज्य विकले आहे. भाजपचा नेता जागतिक वारसास्थळाच्या ठिकाणी बंगला बांधत असताना हे तिन्ही पक्ष एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. पण हे सगळे चोर आहेत. गेल्या चार दिवसांपासून अमित पालेकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासमवेत इतरही आंदोलक आहेत. केवळ गोवा वाचविण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली आहे. त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. ते गोव्याच्या लोकांसाठी, भ्रष्टाचाराविरूध्द ते लढत आहेत, असा हल्लाबोल दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT