अमित पालेकर यांची प्रकृती खालावली

अमित पालेकरांच्या या उपोषणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, सरकारने परवाने रद्द केल्यानंतरही बांधकाम पाडण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.
Amit Palekar health deteriorated
Amit Palekar health deterioratedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ॲड. अमित पालेकर (Amit Palekar) यांच्या बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, उपोषण सुरूच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. कॅजिटन चर्च परिसरातील अवैध बांधकाम पाडून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या आठ दिवसांपासून तेथे साखळी उपोषण केले जात होते. दरम्यान, ‘आप’चे(AAP) नेते अमित पालेकर यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.

अमित पालेकरांच्या या उपोषणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, सरकारने परवाने रद्द केल्यानंतरही बांधकाम पाडण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. यापूर्वी सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते. पण, आंदोलकांनी साखळी उपोषणाला सुरवात केल्यानंतर पंचायत परवाना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर पालेकर यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात केल्यानंतर ‘टीसीपी’ने परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही पालेकर यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांची डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जात आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सरकारने त्‍वरित यासंदर्भात निर्णय घेत बांधकाम जमिनदोस्त करावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

Amit Palekar health deteriorated
मुलीला आंदोलनस्थळी पाहून पालेकर भावुक!

अधिकाऱ्यांकडून दिशाभूल?

प्रशासकीय यंत्रणा हे प्रकरण म्हणजे फसवणूक असल्याचे म्हणत आहेत. पण, अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्‍या पाठिंब्याची गरज असते. जर अधिकारीच फसवणूक झाल्याचे म्हणत असतील, तर त्यांनी दोषींची नावे जाहीर करावीत, असे ॲड. अमित पालेकर म्हणाले.

वाढता पाठींबा

अनेकजण अमित पालेकर यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. भंडारी समाजाचे सदस्य अनिश बकाल हेही संपाच्या तिसऱ्या दिवशी पालेकर यांना भेटायला आले. बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पालेकर यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला आले होते. त्यांच्या भेटीने ते भावूक झाले आणि भारावून गेले. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसह काही नेत्यांनी या प्रकरणावरून एकमेकांवर चिखलफेक चालविली होती. पण, आता आंदोलन तीव्र झाल्यानंतर सगळ्यांनीच शेपूट घातली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Amit Palekar health deteriorated
अन्यथा आमरण उपोषण, जुने गोवेसाठी अमित पालेकर यांचा इशारा

‘टीसीपी’ने मंगळवारी परवाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे. मात्र आदेशाचा अभ्यास होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. पंचायतीने काम थांबवण्याची नोटीसही बजावली आहे, पण ती पुरेशी नाही. ही केवळ धूळफेक आहे. बांधकाम पाडण्याच्या आदेशाबद्दल कोणी बोलत नाही. एकदा बांधकाम पाडण्याचे आदेश जारी केले, तर आम्ही विश्वास ठेवू शकतो.

-ॲड.अमित पालेकर, ‘आप’चे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com