Staff Selection Commission: राज्यातील विविध खात्यांमध्ये नोकरभरती करण्यासाठी 8 जानेवारी 2022 पूर्वी जाहिराती देण्यात आल्या होत्या आणि त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
अशी सरकारी नोकरीची पदे भरण्याची निवड प्रक्रिया 31 ऑगस्ट 2023 पर्यंत खात्यांतर्गत परीक्षा घेऊन करता येणार आहे.
यासंदर्भात गोवा राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या नियमात दुरुस्ती करणारा आदेश राज्यपालांच्या सहीने काढण्यात आला आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध खात्याने नोकर भरतीच्या जाहिराती दिल्या होत्या.
त्या जाहिरातींनुसार नोकरभरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, निवडणुकीमुळे त्यावेळी खंड पडला होता.
ही नोकरभरती खात्यांतर्गत 10 मे 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत आज संपली तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
त्यामुळे सरकारने त्याला मुदतवाढ देताना ती 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे खात्यांना ही नोकरभरती करण्यासाठी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर भरतीच्या जाहिराती काढल्या होत्या. त्यामध्ये आरोग्य, बांधकाम, पोलिस यासारख्या खात्यामध्ये मोठी नोकरभरती प्रक्रिया सुरू झाली होती.
लोकसभेवर डोळा
निवडणूक आचारसंहितेमुळे ही नोकरभरती ठप्प झाली होती. त्यानंतर पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आल्यावर या नोकर भरतीला काही खात्यांनी सुरुवात केली होती; मात्र ती पूर्ण झालेली नाही.
आता पुढील वर्षी लोकसभा निवडणूक येत असल्याने पुन्हा ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आयोगाच्या नियमात बदल केला आहे. सरकारने यावर्षीपासून नोकरभरती केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.