Panjim Smart City: ‘स्मार्ट सिटी’च्या कामांना महिनाभरात पूर्णविराम!

मुख्यमंत्री : मंत्री काब्राल-महापौरांकडून पाहणी
Panaji Smart City
Panaji Smart CitySandip Desai
Published on: 
Updated on: 

Panjim Smart City पावसाळा तोंडावर आला असताना राजधानी पणजीतील ‘स्मार्ट सिटी’ची कामे अद्यापही बाकी आहेत. अवकाळी पाऊस कधीही पडू शकतो.

अशा स्थितीत ही कामे तातडीने व्हावीत, यासाठी नागरिकांकडून दबाव वाढला आहे. यावर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही कामे महिनाभरात पूर्ण केली जातील, अशी ग्‍वाही दिली.

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आज महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह विविध खात्यांच्या प्रमुखांना सोबत घेऊन संपूर्ण स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला. पणजीचे आमदार आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनीसुद्धा ही कामे तातडीने पूर्ण होतील, असे आज स्पष्ट केले.

Panaji Smart City
Goa Government: पेन्शनधारकांच्या थकित पेन्शनचा मार्ग आता मोकळा, मंत्रिमंडळाने घेतलाय 'हा' निर्णय

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत राजधानी पणजीची निवड झाली आहे. त्‍याअंतर्गत ही कामे सुरू आहेत. त्‍यात राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याबरोबर जलस्रोत, मलनि:सारण, वीज, कचरा व्यवस्थापन यांसह अनेक खाती सक्रिय आहेत.

विविध खात्यांची कामे एकत्रितपणे सुरू आहेत. मात्र, ती संथ गतीने सुरू आहेत. आता मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही कामे तातडीने पूर्ण करण्‍यासाठी नागरिकांकडून दबाव वाढत आहे. त्‍यामुळेच आज मुख्‍यमंत्री सावंत यांना अशी ग्‍वाही द्यावी लागली.

Panaji Smart City
नागरी पुरवठा खाते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, स्वस्त धान्य दुकानांतून चक्क सडलेल्या तांदळाचे वाटप

कामे उरकण्याचा कंपनीला आदेश

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांना या संपूर्ण कामांचा आढावा घेण्याची सूचना केली. त्यानुसार काब्राल यांनी महापौरांसमवेत संपूर्ण कामांचा आढावा घेतला.

आता या कामांना गती येणार आहे. त्‍यामुळे ती 1 जूनपूर्वी पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न असेल. तसा आदेश संबंधित कंपन्‍या आणि कंत्राटदारांना देण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Santinez Footpath Damage Panaji
Goa Assembly Election 2027
Goa Electricity Rates Latest
Horoscope Today August 28, 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com