Rohan Khaunte : गोवा टॅक्सी ॲप लवकरच कार्यान्वित

मंत्री रोहन खंवटे : गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा हवी
Taxi App | Rohan Khaunte
Taxi App | Rohan KhaunteGomantak Digital Team
Published on
Updated on

पणजी : गोवा टॅक्सी ॲप लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या ॲपचे व्यवस्थापन टॅक्सी संघटनाच करतील आणि येणारा महसूल टॅक्सी चालकांपर्यंत पोहोचेल. बेकायदेशीर टाउट्सवर व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पर्यटन कायद्यात बदल करण्यात येतील, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

पर्वरी सचिवालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, आयटी विभागामार्फत तयार करण्यात आलेले गोवा टॅक्सी ॲप पूर्वी क्यू प्रणालीवर कार्यरत होते आणि लवकरच ते ॲप म्हणून सुरू केले जाईल.

पेडणेवासीयांच्या निळ्या टॅक्सी आणि इतर मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वचनबद्धतेसाठी हे केले जात आहे, हे पेडणेवासीयांना कळायला हवे, याकडे खंवटे यांनी लक्ष वेधले.

Taxi App | Rohan Khaunte
Goa Government: पेन्शनधारकांच्या थकित पेन्शनचा मार्ग आता मोकळा, मंत्रिमंडळाने घेतलाय 'हा' निर्णय

‘दलालांविरुद्ध कारवाई होणार’

टाउटसच्या मुद्यावर भाष्य करताना खंवटे म्हणाले की, पर्यटन क्क्षेत्रात दलालांचा प्रश्न आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांच्यासह पर्यटन संचालक हे बेकायदेशीर टाउट्सची टोळी पकडतील आणि त्यांना दंडही दिला जाईल. बेकायदेशीर टाउट्स आपल्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले.

पर्यटन कायद्यात काही सुधारणा आवश्यक आहेत. आगामी अधिवेशनात जो पर्यटन कायदा येईल त्यात हे सर्व निकष असतील. टाउट्स संपूर्ण गोव्यात आणि मुख्यतः कळंगुटमध्ये आहेत आणि अशी ठिकाणे जी पर्यटकांसाठी हॉटस्पॉट आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com