Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

MPA: स्थानिकांना सन्मान नाही. त्यामुळे आपणास विकासच दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. बायणा येथे एमपीए उभारलेल्या दोन लोखंडी फाटकांची पाहणी आमदार सरदेसाई यांनी केली.

Sameer Panditrao

वास्को: मुरगाव बंदर प्राधिकरण(एमपीए) ही स्वायत्त संस्था असल्याने, ती येथील सर्व गिळंकृत करून पाहत आहे. स्थानिकांना येथून बाहेर काढून स्वतःला पाहिजे, ते एमपीए करू पाहत आहे, असा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी येथे शुक्रवारी (ता.४) केला.

एमपीएची दादागिरी, कोळसा क्षमता, प्रदूषण, कचरा वाढत आहे. स्थानिकांना सन्मान नाही. त्यामुळे आपणास विकासच दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. बायणा येथे एमपीए उभारलेल्या दोन लोखंडी फाटकांची पाहणी आमदार सरदेसाई यांनी केली.

विजय सरदेसाई यांनी आमचो आवाज विजय अंतर्गत मुरगाव तालुक्यासाठी जनता दरबार आयोजित केला होता.याप्रसंगी दुर्गादास कामत, चिखलीचे माजी सरपंच सेबी परेरा, माजी नगरसेवक नीलेश नावेलकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, जयेश शेटगावकर, बोगमाळाचे माजी सरपंच लक्ष्मण कवळेकर तसेच इतरांनी उपस्थिती लावली होती. याप्रसंगी उपस्थितांपैकी काहीजणांनी आपल्या समस्या मांडल्या.

शंकर पोळजी यांनी मुरगाव पालिकेतील काही कर्मचाऱ्यांची व कामगारांची १५ पेक्षा जास्त वर्षे सेवा होऊनही त्यांना सेवेत अद्याप कायम करण्यात येत नसल्याचे सांगितले. नीलेश नावेलकर यांनी येथील लोकप्रतिनिधी झोपले असल्याने, सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोहचत नसल्यचा दावा केला.

भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांनाच ‘अच्छे दिन’

मुरगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आदींनाच ‘अच्छे दिन’ आले आहेत. सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. येथे एमपीए दादागिरी करीत आहे. एमपीएची दादागिरी एवढी वाढली आहे की, ती आपली मनमानी करीत आहे. येथील वास्को आमदाराने एमपीएविरोधात आवाज उठवला होता. तथापि एमपीएच्या दादागिरीला औषध नाही. गोवा सरकार हे एमपीएसमोर शरण गेल्याचा दावा विजय सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bogus Voter: ..सापडला बोगस मतदार! नेपाळी नागरिकाकडे गोव्‍याची कागदपत्रे; सुकूर-पर्वरी येथील नोंदविला पत्ता

Mungul Margao: गँगवारने मडगाव हादरले! थरारक पाठलाग, कोयते, बाटल्‍यांनी हल्ला; दोघे गंभीर, गाडीवर गोळीबार

Rashi Bhavishya 13 August 2025: आर्थिक नियोजनात यश,आरोग्याची काळजी घ्या; प्रवास टाळावा

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

SCROLL FOR NEXT