Mormugao Market: मुरगावात अतिक्रमणाविरुद्ध धडक कारवाई! मार्केटमधील विक्रेत्यांचे साहित्य जप्त; कारवाईनंतर ‘ये रे माझ्या मागल्या’

Mormugao Vegetable Market: मुरगाव पालिकेने भाजी मार्केटात अतिक्रमणविरोधी कारवाई करून काहीजणांचा माल व वस्तू जप्त केल्या. रस्त्यावर अतिक्रमण करून साहित्य मांडू नका, अशी सूचना त्या विक्रेत्यांना करण्यात आली आहे.
Mormugao Vegetable Market
Mormugao Vegetable MarketDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव पालिकेने भाजी मार्केटात अतिक्रमणविरोधी कारवाई करून काहीजणांचा माल व वस्तू जप्त केल्या. रस्त्यावर अतिक्रमण करून साहित्य मांडू नका, अशी सूचना त्या विक्रेत्यांना करण्यात आली आहे. मात्र, काही विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. मुरगाव पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाठ वळताच त्यांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून पालिकेसमोर एक आव्हान उभे केले आहे.

येथील भाजी मार्केटात भाजी, फळे, नारळ तसेच इतर विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने आहेत. या विक्रेत्यांना पालिकेने जागा आखून दिली आहे. तथापि आपल्या दुकानांतील जागा रिकामी ठेवून माल रस्त्यावर मांडण्याची सवय विक्रेत्यांना लागली आहे.

याविरोधात बऱ्याचदा कारवाया झाल्या होत्या. तथापि त्या विक्रेत्यांनी अतिक्रमण करण्याची सवय सोडली नसल्याने मुरगाव पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हात टेकले आहेत. मध्यंतरी काही नगरसेवकांनी याप्रकरणी लक्ष घातले होते.

त्यांनाही सदर अनुभव आला. आता लेखाधिकारी उदय वाडकर, कर्मचारी प्रसन्ना होन्नावरकर, मंगलदास खांडेपारकर, पालिका निरीक्षक यांनी संयुक्तपणे अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Mormugao Vegetable Market
Mormugao Port: मुरगाव बंदरातून लवकरच थेट कंटेनर सेवा! गोव्यातील उद्योगांना होणार फायदा, ‘ओशन नेटवर्क ’चा पुढाकार

अतिक्रमण टाळण्यासाठी कर्मचारी तैनात

गेल्या दोन तीन दिवसांत या पथकाने काही विक्रेत्यांचा माल व सामान जप्त केले आहे. तेथे पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी पालिकेच्या दोन तीन कामगारांना लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले आहे. त्यामुळे विक्रेते रस्त्यापासून काहीसे मागे गेले आहेत. तरी रस्त्यावर काही प्रमाणात अतिक्रमण करून माल विक्री करण्यात येत असल्याचे दिसून आले.

Mormugao Vegetable Market
Mormugao: मुरगाव बंदरात डेल्टा पोर्ट्‌सकडून विक्रम, 24 तासांत 30 हजार टन लोहखनिज पॅलेट्स भरून रचला इतिहास

कडक कारवाई व्हावी!

अतिक्रमण रोखण्यासाठी आता कडक कारवाईची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. या विक्रेत्यांविरोधात तसेच विनापरवाना हातगाडी विक्रेत्यांविरोधात कारवाई करावी,अशी मागणी होत आहे. त्या विक्रेत्यांनी पालिकेसमोर उभे केलेल्या आव्हानाचा सामना पालिका करू शकत नसल्याच्या उपहासत्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com