Curchorem Ambulance MLA Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Curchorem Health Centre: अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे कुडचडेत लोकांना दिलासा

Nilesh Cabral: अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

गेली बारा वर्षे आम्ही सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी कधीच कामे केली नाहीत. काम कसे करावे हे मला कुणी ही शिकवू नये. ज्यांना खरेच लोकांसाठी काम करायचे आहे त्यांनी प्रथम लोकांसाठी काही तरी करवून दाखवावे, असे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.

कुडचडे आरोग्य केंद्रात आयोजित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध झाली असल्याने लोकांना आता बराच दिलासा मिळणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष प्रदीप नाईक, नगरसेवक प्रसन्ना भेंडे, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ देसाई, सरपंच कविता देसाई, पंच मनोज नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा कुडचडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुडचडे आरोग्य केंद्राची भव्य अशी इमारत उभी राहिली असून याठिकाणी लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मी सदैव प्रयत्न केला आहे. याठिकाणी डायलिसिस युनिट सुरू करण्यात आला असून याचा या भागातील रुग्णांना चांगला लाभ होतो पूर्वी डायललासीस उपचार करण्यासाठी मडगावला जावे लागत होते असे काब्राल यांनी सांगितले.

वीस खाटांची क्षमता असलेल्या प्रसूती विभागात स्त्री रोगतज्ज्ञाची आवश्यकता आहे. केवळ स्त्री रोगतज्ज्ञ नेमून काही होणार नाही.८० टक्के प्रसूती सिझेरियन पद्धतीने होत असल्याने सर्जन आणि भुलतज्ज्ञांची ही आवश्यकता भासणार असून ते सर्व एकाच वेळी उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे नीलेश काब्राल यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

SCROLL FOR NEXT