Madgaon Accident Dainik Gomantak
गोवा

मडगावमध्ये अल्टो कारची दुचाकीला जोरदार धडक

अपघातात दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव : झुआरी पुलावरुन कार कोसळून झालेला अपघात ताजा असतानाच आता मडगावमध्येही अशाच प्रकारचा अपघात झाला आहे. अल्टो कारची दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला. यात दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील एका तरुणीच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. तर दुसऱ्या मुलीचा डोळाच अपघातामध्ये बाहेर आल्याची माहिती आहे. मडगावातील रामनगरी रोडवर हा अपघात झाला असून जखमींमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. दोन्ही जखमींना तातडीने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अल्टो चालकाला अटक केली असून तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान गोव्यात गुरुवार अपघातवार ठरला आहे. झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्री कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात शोधपथकाला यश आलं आहे. आता कारमधील 4 मृतदेहही कारचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळखही पटवण्यात आली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT