Colva Death Case Dainik Gomantak
गोवा

पोटात दुखल्याने रुग्णालयात गेला, पदवी नसलेल्‍या डॉक्‍टरने इंजेक्‍शन दिले अन् बिहारचा रुग्‍ण दगावला

Margao Goa: पोलिसात तक्रार; क्‍लिनिक कायमचे बंद करण्‍याची स्‍थानिकांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ‘अल्‍टरनेटीव्‍ह मेडिसीन’ या अभ्‍यासक्रमाचे प्रमाणपत्र असलेल्‍या कोलवा येथील डॉ. स्‍वर्णा परहम या महिला डॉक्‍टरकडून धरमवीर साह (३५) या रुग्‍णावर ॲलोपथी उपचार केल्‍यानंतर त्‍या रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली असून मृताची पत्‍नी रुबी देवी हिने या प्रकरणी डॉक्‍टरवर हलगर्जीपणामुळे मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍याचा गुन्‍हा नोंद करावा अशी तक्रार पोलिसात दिली आहे.

कोलवा येथे गवंडी काम करणाऱ्या मूळ बिहार येथील धरमवीर याच्‍या पोटात दुखत असल्‍यामुळे त्‍याला ६ ऑगस्‍ट रोजी या डॉक्‍टरकडे नेण्‍यात आले होते. तिथे या डॉक्‍टरने त्‍याला एक इंजेक्‍शन दिले, त्‍यानंतर त्‍याची प्रकृती ढासळल्‍याने त्‍याला मडगावातील एका इस्‍पितळात पाठविण्‍यात आले.

मात्र, तिथे त्‍याला मृत घोषित करण्‍यात आले. हा मृत्‍यू वैद्यकीय हलगर्जीपणामुळे झाल्‍याचा आरोप झाल्‍यानंतर त्‍याच्‍या मृतदेहाची शवचिकित्‍सा करण्‍यासाठी तीन डॉक्‍टरांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती.

त्‍यानुसार ८ ऑगस्‍ट रोजी हॉस्‍पिसियोचे न्‍यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर, वरिष्‍ठ पॅथॉलॉजिस्‍ट डॉ. सियानो फर्नांडिस आणि वरिष्‍ठ फिजिशियन डॉ. एडवर्ड डिमेलो यांनी धरमवीरच्‍या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली.

या रुग्‍णावर ॲलोपथी उपचार करणाऱ्या महिला डॉक्‍टर परहम या ॲलोपथी तज्‍ज्ञ नसून त्‍यांच्‍याकडे ‘अल्‍टरनेटीव्‍ह मेडिसीन’ची पदवी असल्‍याचे समोर आले असून कोलवा येथे त्‍यांचे जे क्‍लिनिक चालू होते, तेही गोवा सरकारकडे नोंदणीकृत नव्‍हते असा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. त्‍यामुळे हे क्‍लिनिक बेकायदेशीर ठरत असून त्‍याला कायमचे सील ठोकावे अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे.

इंजेक्शनमुळे प्रकृती खालावल्याचा दावा

यासंदर्भात कोलवा पोलिसांशी संपर्क साधला असता, या प्रकरणात अजूनही रुग्‍णाच्‍या पत्‍नीने अधिकृत तक्रार केली नाही. मात्र, आपल्‍या जबानीत तिने या डॉक्‍टरने इंजेक्‍शन दिल्‍यानंतर आपल्‍या पतीची प्रकृती खालावली आणि नंतर त्‍याचे निधन झाले असे म्‍हटले आहे. या मृत्‍यूमागे वैद्यकीय हलगर्जीपणा आहे का? हे आम्ही पडताळून पाहात आहोत, असे पोलिसांकडून सांगण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT