मुसळधार पावसामुळे आज मिर्याभाट-मंडूर येथे घराची भिंत कोसळून आई व मुलगा ठार झाला. मारिया रॉड्रिगीस (७१) आणि आल्फ्रेड रॉड्रिगीस (५१) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात पावसाने ५ बळी घेतले आहेत. काल कुंडई येथे भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता.
आल्फ्रेड रॉड्रिगीस यांची बायको सहा महिन्यांपूर्वीच वारली होती. त्यानंतर आता त्यांच्यासह त्यांच्या आईवर काळाने घाला घातल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या फर्नांडिस कुटुंबात विल्फ्रेड यांचा भाऊ सायमन, त्याची पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. तसेच त्यांना चार विवाहित बहिणी आहेत. काही वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला होता.
फर्नांडिस कुटुंबाचे घर धोकादायक स्थितीत आहे. एक भिंत काही महिन्यांपूर्वीच कोसळली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून आता या कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. घरदुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून सायमन यांनी अर्ज केला होता. घटनेवेळी सायमनची बायको आणि दोन मुले शालेय साहित्य आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्यामुळे सुदैवाने ती वाचली.
सदर घटना क्लेशदायक असून, गावात शोकाकूल वातावरण आहे. गेल्या वर्षी घराची भिंत कोसळल्यानंतर फर्नांडिस कुटुंबाने आपत्कालीन व्यवस्थापन निधीसाठी अर्ज केला होता. सरकारने हा निधी त्वरित मंजूर केला असता तर ही घटना घडली नसती.
वीरेश बोरकर, आमदार (सांतआंद्रे)
मिर्याभाट-मंडूर येथील घटनेत आई व मुलाचा मृत्यू झाल्याचे अतिव दुःख आहे. या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी दुर्घटना आपल्याबाबत घडू नये म्हणून लोकांनीसुद्धा आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
फ्रान्सिस सिल्वेरा, माजी आमदार (सांतआंद्रे)
गोवा वेधशाळेचे जुने रेकॉर्ड पुण्यात नोंदविले जातात. १९०१ पासून आत्तापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार गोव्यात काल रविवारी बरसलेला पाऊस हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पाऊस आहे. सर्वाधिक पाऊस १ जुलै १९८७ रोजी १३.१७ इंच इतका पडला होता.
पुष्पलता फर्नांडिस, (गोवा वेधशाळा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.