Dr. Pramod Sawant | 75th Independence Day Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : सर्व विरोधी पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुढे यावे

सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन गोव्यासाठी कम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दैनिक गोमन्तक

आज 15 ऑगस्ट रोजी 75 व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त जुन्या सचिवालयाजवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी अनेक विषयांबद्दल मोठी घोषणा केली आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन गोव्यासाठी कम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

यावेळी 'स्वयंपूर्ण गोवा' योजनेंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, स्वयंपूर्ण गोव्यातील सर्व प्रमुख कार्यक्रम सुरूच राहतील, हे आम्ही स्वतःहून यशस्वी करू शकत नाही. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, सर्व पंच सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुढे येण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून ही आणि अशा इतर कल्याणकारी योजना एकत्रपणे राबवण्याची गरज आहे.

दरम्यान, गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या स्मरणार्थ गावांमधील शाळांना हुतात्म्यांची नावे देणार अशी घोषणा त्यांनी केली. शिवाय उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोव्यातील अधिकाऱ्यांना सेवा पदक देण्यात आले असून स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT