स्वातंत्र्यदिनानिमित्त पेडणे येथे किसान मोर्चोतर्फे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॅक्टर रॅलीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून मिरामार येथे महिलांना पिंक अटो रिक्षाचे वाटप करण्यात आले.
डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रादेवी येथे गोवा सरकार हुतात्मा स्मारक उभारणार आहे. पत्रादेवी हुतात्मा स्मारक येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहिल. ज्या हूतात्म्यांनी रणसंग्रामात बलिदान दिले, त्यांची आठवण या निमित्ताने कायम आपल्यासोबत राहील असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कुजिरा-बांबोळी येथील अॅथलेटिक्स स्टेडिअमवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, क्रीडा खात्याच्या कर्मचारी आर्थिनिसीयात फर्नांडिस यांचा मृत्यू झाला, त्यांचे वय 55 वर्षे असून कोलवा याठीकाणी ते वास्तव्यास होते. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
'स्वयंपूर्ण गोवा' योजनेंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, स्वयंपूर्ण गोव्यातील सर्व प्रमुख कार्यक्रम सुरूच राहतील, हे आम्ही स्वतःहून यशस्वी करू शकत नाही. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, सर्व पंच सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुढे येण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून ही आणि अशा इतर कल्याणकारी योजना एकत्रपणे राबवण्याची गरज आहे.
75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आज जुन्या सचिवालयाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यानिमित्त 'रोड रेस' चे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये 3 किमी, 5 किमी, 7 किमी आणि अर्धा किमी असे अंतर असून आणि 14 ते 16, 16 ते 18 आणि18 वरील असा वयोगट आहे.
रस्ते, हवाई, जल कनेक्टिव्हिटीसाठी सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे; समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना घेऊन जात आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोव्यातील अधिकाऱ्यांना सेवा पदक देण्यात आले असून आज स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.
अग्निशामक दल : श्री. श्रीकृष्ण रवींद्र Parhikar.
होम गार्ड : श्रीमती मीनाक्षी कुबल
श्रीमती नयन दिपू वेलींगकर
शिक्षण खाते : भारत पाटील
महसूल खाते : ड्राफ्ट्समन 2 - श्री. शेख इस्माईल
गावातील शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावं देणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पणजी येथे मुख्यमंत्री सावंत यांनी तिरंगा फडकावला; रस्ते, हवाई, जल कनेक्टिव्हिटीसाठी सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे; समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना घेऊन जात आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ते पुढे म्हणाले, भारत ही लोकशाहीची जननी आहे. दरम्यान, गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या स्मरणार्थ गावांमधील शाळांना हुतात्म्यांची नावं देणार अशी घोषणा त्यांनी केली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी येथील निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी पोलीस प्रशासन आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.
75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज गोव्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'हर घर तिरंगा' मोहिमेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मागील 3-4 दिवसात रस्त्यावरील प्रत्येक लहान-मोठ्या दुकानांवर, प्रत्येक घरावर आपला तिरंगा दिमाखात फडकताना दिसत आहे.
गोव्यात आज सकाळपासून देशभक्तीपर घोषणा देत शाळांच्या प्रभातफेऱ्यांनी रस्ते गजबजले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.